पुणे : हॉटेल मध्ये जेवायला गेल्यावर ग्राहकांना अनेक ऑफर, सूट आणि डीस्काउंट दिले जातात तर कधी कधी खवय्यांसाठी स्पर्धा देखील ठेवल्या जातात. यामध्ये बाहुबली सिनेमानंतर प्रसिद्ध झालेली बाहुबली थाळी अनेकांना माहिती आहे. मात्र आता पुण्यातील एका हॉटेलने ग्राहकांना जेवणाची थाळी संपवा आणि रॉयल एन्फिल्ड बुलेट जिंका अशी भन्नाट ऑफर दिली आहे.
पुण्यातील ही ऑफर देणाऱ्या हॉटेलच नाव आहे ‘शिवराज हॉटेल’. पुण्यातील वडगाव मावळ या भागात हे हॉटेल आहे. कोरोना नंतर हॉटेल सुरु झाल्यावर हॉटेल व्यावसायीकांकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन मार्ग अवलंबले जात आहेत. यामध्ये हा हॉटेल थेट ग्राहकांना बुलेट जिंकण्याची संधी दिली आहे.
काय आहे ऑफर –
हॉटेल मालक अतुल वायकर यांनी सांगितले की, आम्ही ग्राहकांना ही ऑफर देत आहोत. यामध्ये जर तुम्ही एका तासामध्ये ही नॉनव्हेज थाळी संपवली तर तुम्हाला 1.65 लाख रुपये किंमतीची रॉयल एन्फिल्ड बुलेट जिंकता येणार आहे. जी हॉटेलच्या व्हरांड्यात ठेवण्यात आली आहे.
बुलेट थाळी –
ही थाळी नॉनव्हेज थाळी असून यामध्ये ४ किलो मटणापासून १२ प्रकारच्या डिशेश बनवण्यात आल्या आहेत. ५५ जनांनी ही थाळी बनवली असून यामध्ये फ्राइड सुरमई, पोम्फ्रेट फ्राई फिश, चिकन तंदुरी, ड्राय मटण, ग्रे मटन, चिकन मसाला आणि कोलंबी (कोळंबी) बिर्याणी. या डिशेश आहेत. तर या थाळीची किंमत २५०० रुपये आहे. यासाठी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून दररोज ६५ थाळीची विक्री होत आहे. आतापर्यंत एका ग्राहकाने ही थाळी पूर्ण संपवली असून त्याने रॉयल एन्फिल्ड बुलेट जिंकली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सोमनाथ पवार अस या ग्राहकाच नाव आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुणे भाजपमध्ये मोठ्या बंडाळीची शक्यता, १९ नगरसेवक पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत ?
- अशोक चव्हाणांनी मराठा समाजाची फसवणूक केली; विनायक मेटेंचा घणाघात!
- गावचा विकास करण्यासाठी आम्ही नेहमीच सोबत राहू; निलेश राणे यांनी केले विजयी उमेदवारांचे कौतुक
- ऋषभ पंतच्या झुंजार खेळीनंतर लाडक्या बहिणीने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
- ‘शिवसेनाप्रमुखांचे नाव कशा कशाला व किती ठिकाणी द्यायचे, याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
