Share

‘स्टेअरिंग ठाकरेंच्याच हातात, अडथळे अनेक पण त्यांची गाडी व्यवस्थित चाललेली आहे’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ३२ व्या राज्य रस्ता सुरक्षा अभियानाचे उदघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल सह्याद्री अतिथीगृहावर झाले. यावेळी त्यांनी, ‘मी चांगली कार चालवतो की नाही माहीत नाही. पण सध्या कार आणि सरकार दोन्ही चालवतो आहे,’ असं विधान केल्यानंतर उपस्थितांमध्ये हाशा पिकला होता.

‘मी उत्तम गाडी चालवतो की नाही याची कल्पना नाही. पण सध्या कार आणि सरकार दोन्ही चालवतोय. मध्ये मध्ये स्पीडब्रेकर येत असतात, खड्डेही असतात. पण तरीसुद्धा स्टेअरिंगवरची पकड मी सुटू देणार नाही.’ असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांना यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न केल्यानंतर त्यांनी देखील त्यांच्या शैलीत उत्तर दिलं आहे. ‘स्टेअरिंग त्यांच्या हातात आहे आणि अनेक अडथळे समोर आहेत हे आम्हाला सर्वांना दिसतंय. पण तरीदेखील त्यांची गाडी व्यवस्थित चाललेली आहे.’ असं जयंत पाटील म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी ग्रामपंचायती निवडणुकांवरून भाजपवर जोरदार टीकास्त्र देखील सोडलं. ‘भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व हे फार मर्यादित आहे’ असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!