🕒 1 min read
जालना : सोमवारी राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. परंतु यापैकी 1,523 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. जालन्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकालाबाबत बोलताना शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकरांनी हा शिवसेनेसह महाविकास आघाडीचा विजय असल्याचे म्हटले आहे.
खोतकर म्हणाले की, ग्रामीण जनतेने महाविकास आघाडीला कौल देऊन विकासाची दूरदृष्टी असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर मोहोर उठवली आहे. दुसरीकडे, शेतकरी आंदोलनाचा चेष्ट करत शेतकरी आंदोलनात चीन- पाकिस्तानचा हात असल्याचे बेताल वक्तव्य करणाऱ्यांना ग्रामीण जनतेने चांगली चपराक लगावली आहे. शिवसेनेसह महाविकास आघाडीने या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारत भाजपच्या बालेकिल्ल्यातच दिग्गजांना पराभवाची चव चाखायला लावल्याचेही ते म्हणाले.
माजी मंत्री खोतकर म्हणाले की, भाजप शिवसेनेचा हात धरून पुढे आली, परंतु भाजपने आमच्याच पाठीत खंजीर खुपसला. परंतु ग्रामीण भागातील जनतेने मी-मी म्हणणाऱ्यांचा अखेर माज उतरवला. भाजपची सत्ता असलेल्या पिंपळगाव रेणुकाई ग्रामपंचायतीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व मिळवले. याशिवाय जालन्यातील भिलपुरी, सिंधी काळेगाव, निरखेडा या ग्रामपंचायतींमध्ये एकहाती सत्ता मिळवली आहे. दरेगाव, काजळा, गुंडेवाडी, हिस्वन येथेही महाविकास आघाडीने विजयी कामगिरी केली, असे अर्जुन खोतकर यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- मी नरेंद्र मोदी किंवा भाजपला घाबरत नाही, मी स्वच्छ चारित्र्याचा आहे : राहुल गांधी
- ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ खडसेंचं लक्ष्यवेधी ट्विट
- विमानतळाचे नाव होणार छत्रपती संभाजीराजे विमानतळ-अतुल सावे
- ऑस्ट्रेलियाला लोळवल्यानंतर इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज
- ‘गद्दारी करून ठाकरे सरकार मध्ये बसलेत,त्यांना अपेक्षित यश कधीच मिळणार नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
