Share

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ खडसेंचं लक्ष्यवेधी ट्विट

Published On: 

🕒 1 min read

मुक्ताईनगर : राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल संमिश्र लागले आहेत. राज्यातले प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षांनी आपापल्या क्षेत्रांवर पुन्हा वर्चस्व सिद्ध केले आहे.

ग्रामपंचायतीच्या निवडणुका या राजकीय पक्षाच्या अधिकृत चिन्हावर होत नसल्यामुळे, सर्वच राजकीय पक्षाचे नेते निवडून आलेल्या उमेदवारांना ‘आपले’ म्हणत आहेत. त्यामुळे सरपंच निवडणुकीनंतरच ग्रामपंचायत निवडणुकीतले पक्षीय बलाबल स्पष्ट होणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत मराठवाड्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम आदमी पार्टी, एमआयएम तसंच वंचित बहुजन आघाडीने लक्षवेधी कामगिरी केली. उस्मानाबाद जिल्ह्यात परंडा तालुक्यातल्या रोसा ग्रामपंचायतीवर, वंचित बहुजन आघाडीने विजय मिळवला.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी ट्विट करुन मुक्ताईनगरमध्ये महाविकासआघाडीला 71 ग्रामपंचायतींमध्ये यश मिळाल्याचे सांगत मोठ्या विजयाचा दावा केला आहे.दरम्यान, मुक्ताईनगरमधील कोथळी ग्रामपंचायतीच्या निकालामुळे मोठं संभ्रमाचं वातावरण तयार झालं आहे.

ग्रामपंचायत एकूण अकरा जागांची होती. यामध्ये दोन जागा बिनविरोध होत्ता. त्यामुळे नऊपैकी 5 याठिकाणी शिवसेनेनं विजय मिळवला तर सहा उमेदवार आम्ही ना राष्ट्रवादीचे ना भाजपचे आम्ही खडसे परिवाराचे असल्याचं त्यांनी म्हटल्यानं याठिकाणी संभ्रमाचं वातावरण आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!