🕒 1 min read
औरंगाबाद : समर्थनगर येथील सुप्रसिद्ध वरद गणेश मंदिराचा 50 वा वर्धापन दिन 21 जानेवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. 1971 साली स्थापन झालेल्या गणेश सभेने या मंदिराची उभारणी केली होती. यानिमित्त गणेश सभेच्या वतीने 51 कुंडी गणेश याग तसेच अन्न छत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. ही माहिती मंदिर संयोजन समितीने दिली आहे.
औरंगाबादकरांचे श्रद्धास्थान असलेल्या वरद गणेश मंदिरात या 50व्या वर्धापन दिनानिमित्त सुवर्णजडित सिंहासनही बसवण्यात येणार आहे. 51 कुंडी यागासाठी भाविकांच्या वतीने देणगीही मिळत आहे.
गणेश सभेच्या वतीने सध्या या ठिकाणी वाचनालय, विवाह सोहळ्यासाठी मंगल कार्यालय, वधू-वर नोंदणी, रक्तदान शिबीर, विविध आरोग्य तपासणी शिबीरे हे उपक्रम राबवण्यात येत आहेत. भविष्यात गणेश सभेच्या वतीने वेद पाठशाळा, गोशाळा, गरजू विद्यार्थी दत्तक योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- कोव्हिन अॅपच्या बिघाडामुळे लसीकरणात अडचणी
- राधाकृष्ण विखेंच्या भाचीने राष्ट्रवादीच्या गडाला दिला हादरा; काकडीमध्ये भाजपची सत्ता
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामकरणातील योद्ध्यांचा आठवले करणार सत्कार
- धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपा महिला आघाडी आक्रमक
- परभणी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत झरीवर शिवसेनेचे वर्चस्व
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
