Share

पुढील लोकसभा निवडणुकीत मागील मताधिक्याचा विक्रम तोडला जाईल : चंद्रकांत पाटील

Published On: 

🕒 1 min read

पुणे : ज्यू अल्पसंख्य समुदायाचे राज्यातील प्रमुख डॉ डॅनियल पेणकरआणि पदाधिकाऱ्यांनी शनीवारी सायंकाळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजपा पुणे शहर अल्पसंख्य आघाडीचे अध्यक्ष अली दारूवाला यांच्या विशेष प्रयत्नाने हा प्रवेश लाल देऊळ सिनेगॉग येथे पार पडला.
भाजपा अल्पसंख्य आघाडी प्रदेशाध्यक्ष एजाज देशमुख ,शहराध्यक्ष जगदीश मुळीक , सरचिटणीस राजेश पांडे,पालिका सभागृह नेते गणेश बीडकर उपस्थित होते.

भाजपा अल्पसंख्य आघाडीचे शहराध्यक्ष अली दारूवाला यांनी स्वागत , प्रास्ताविक केले. डेविड ससून ट्रस्ट चे प्रमुख सॉलोमन सोफेर यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला.यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘ भारतीय जनता पक्ष हा देशातील, जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. देशात भाजपाचे राज्य आहे. अशा पक्षा सोबत ज्यू समुदायाचे नाते जोडले जात आहे. ही आनंदाची गोष्ट आहे.पक्षाची सदस्य संख्या, जनाधार सतत वाढत आहे. पुढील लोकसभा निवडणुकीत मागील मताधिक्याचा विक्रम तोडला जाईल याची खात्री अशा कार्यक्रमांमधून होते.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ , भाजपाशी ज्यू समुदाय सतत संबंधित राहिला आहे. आता प्रत्यक्ष कार्यरत होत आहे, ही आनंदाची बाब आहे. अल्पसंख्य समाजाचे प्रश्न भारतीय जनता पक्ष सोडवेल .

सॉलोमन सोफेर म्हणाले ‘ नरेंद्र मोदी यांच्या काळात भारताची वेगवान प्रगती झाली.आम्ही कोणत्याही पक्षाशी संबंधित नसलो तरी या प्रयत्नांबद्दल आम्हाला आस्था आहे.डॉ. डॅनियल पेणकर म्हणाले, ‘ ज्यू अल्पसंख्य समुदायाला प्रथमच कोणीतरी राजकीय पक्षाने मुख्य प्रवाहात येण्याचे निमंत्रण दिले आहे. ही आनंदाची गोष्ट आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!