🕒 1 min read
मुंबई : कृणाल व हार्दिक पांड्या बंधुंवर शनिवारी दुखःचा डोंगर कोसळला. त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याचे वृत्त एएनआय ने प्रसिद्ध केलं आहे. हिमांशू पांड्या यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे प्राथमिक माहितीत कळत आहे. कृणाल सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वें-20 स्पर्धेत खेळत आहे. आणि ही बातमी समजताच त्यानं बायो-बबल कवच सोडून तो घरात परतला. आता तो स्पर्धेत पुढील सामन्यात खेळणार नाही.
”पांड्या कुटुंबीयांवर दुखःचा डोंगर कोसळला आहे आणि त्यामुळे तो स्पर्धा सोडून घरी परतला आहे. बडोदा क्रिकेट असोसिएशन पांड्या कुटुंबीयांच्या दुखःत सहभागी आहेत,”असे बडोदा क्रिकेट असोसिएशनचे सीईओ शीशिर हट्टंगडी यांनी सांगितले.
दरम्यान, भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात रोमांचक सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेला सुरुवात झाली असून. हि स्पर्धा ६ वेगवेगळ्या राज्यांमध्ये खेळली जाईल. स्पर्धा सुरु होण्याआधीच बडोदा संघाचा कॅप्टन कृणाल पंड्या वर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे तो पुढे सामने खेळणार नसल्याचे वृत्त देखील समोर येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- आज सकाळी ११.३० वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लसीकरणाचे उद्घाटन
- ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 369 धावांवर संपुष्टात; भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी
- निश्चिंत व्हा ! व्हॉट्सअॅपने घेतला मोठा निर्णय
- मराठवाड्यातील ६७ हजार ६७३ उमेदवारांचे नशीब ईव्हीएम मध्ये बंद
- ‘सर्वोच्च न्यायालयाने निकाल देऊनही शरद पवारांना रामजन्मभूमी अजूनही वादाचा मुद्दा वाटतो’

