🕒 1 min read
नवी दिल्ली: व्हॉट्सऍपच्या नवीन पॉलिसी वरून जगभरातून टीका होत होती. ग्राहकांच्या माहितीचा वापर करण्याची परवानगी द्या नाही तर सेवा बंद करणे ही एक जबरदस्ती असल्याचं बोललं जात होत. यावर व्हॉट्सऍपने स्पष्टीकरण देखील दिले होते त्यांनतर आता व्हॉट्सअॅपने घेतला मोठा निर्णय घेतला आहे.
या नव्या पॉलिसीमध्ये बिजनेस व्हाट्सअप मध्ये काही बदल करण्यात आले आहेत. ते देखील पर्यायी आहेत. त्याच बरोबर तुम्हाला तुम्ही माहिती कुठून मिळवता आणि वापरता. व्हाट्सअप आज देखील तुमचे मेसेज पाठवू शकत नाही आणि कॉल ऐकु शकत नाही. वॉट्सऐप एंड-टू-एंड एनक्रिप्टेड आहे आणि कायम राहणार आहे. व्हॉट्सऍपने ट्वीट करून ही माहिती दिली आहे. व्हाट्सअप कडून सांगण्यात आले आहे की, कंपनीने आणलेल्या या नवीन पॉलिसी अंतर्गत व्हाट्सअप ग्राहकांच्या संवेदनशील माहिती फेसबुक सोबत शेअर करणार नाही. मित्र आणि परिवारासोबत देखील तुमच्या मेसेजेस ची गुप्तता भंग केली जाणार नाही.
We want to address some rumors and be 100% clear we continue to protect your private messages with end-to-end encryption. pic.twitter.com/6qDnzQ98MP
— WhatsApp (@WhatsApp) January 12, 2021
व्हॉट्सअॅपने ४ जानेवारीला आपल्या नव्या सेवा शर्ती (टर्म ऑफ सर्व्हिस) जाहीर करत सगळ्यांनाच धक्का दिला होता. ८ फेब्रुवारीपासून या सेवा शर्ती लागू केल्या जाणार होत्या. मात्र, जगभरातून होत असलेली टीका लक्षात घेत व्हॉट्सअॅपने एक पाऊल मागे घेत मोठा निर्णय घेतला आहे.
Thank you to everyone who’s reached out. We're still working to counter any confusion by communicating directly with @WhatsApp users. No one will have their account suspended or deleted on Feb 8 and we’ll be moving back our business plans until after May – https://t.co/H3DeSS0QfO
— WhatsApp (@WhatsApp) January 15, 2021
फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअॅपने शुक्रवारी या निर्णयाची घोषणा केली. प्राइव्हसी अपडेट करण्याचा निर्णय पुढे ढकलत असल्याचंव्हॉट्सअॅपने म्हटलं आहे. “ज्या शर्तीची समीक्षा करून त्या स्वीकारण्यासाठी जी तारीख देण्यात आली होती, ती आम्ही मागे घेत आहोत. ८ फेब्रुवारीला कुणीही आपलं अकाऊंट बंद किंवा डिलीट करू शकणार नाही. आम्ही चुकीची माहिती दूर करण्यासाठी आणखी करणार आहोत. व्हॉट्सअॅप गोपनियता आणि सुरक्षेवर कशापद्धतीनं काम करतेय याविषयी स्पष्टता आणणार आहोत. १५ मे रोजी व्यावसायिक पर्याय उपलब्ध करण्यापूर्वी नव्या प्राइव्हसी पॉलिसीबद्दल जाणून घेण्यासाठी हळूहळू लोकांपर्यंत पोहोचणार आहोत,” असं व्हॉट्सअॅपनं म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- विषय पंपावर : भाजप नेत्याच्या वाढदिवसानिमित्त चक्क पेट्रोल २ रुपये स्वस्त !
- तब्बल ६५ वर्षांनी निवडणूक, मात्र ग्रामस्थच काय एकाही उमेदवाराने केलं नाही मतदान !
- ‘पंतप्रधान मोदींनी आधी मीडियासमोर येऊन लस टोचून घ्यावी म्हणजे आमचाही विश्वास बसेल’
- राम मंदिर उभारणीसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोपवला तब्बल ‘इतक्या’ लाखांचा धनादेश !
- आज सकाळी ११.३० वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लसीकरणाचे उद्घाटन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
