🕒 1 min read
औरंगाबाद : शुक्रवारी ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडले. विभागात बहुतांश ठिकाणी दिग्गज उमेदवारांनी नशीब आजमावले. अनेक ठिकाणी तर नात्या-गोत्यातील उमेदवार एकमेकांसमोर उभे राहिल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत चढल्याचे पाहायला मिळाले.
यात औरंगाबाद जिल्ह्यात ६१७ पैकी ३८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरित ५७९ ग्रामपंचायतींसाठी २,२६८ मतदान केंद्रांवर मतदान झाले. जिल्ह्यात ११ हजार ४९९ उमेदवार रिंगणात होते. तर हिंगोलीत जिल्ह्यात ४२२ ग्रामपंचायतीत ३,२०० सदस्यपदांसाठी सुमारे ७५०० उमेदवार रिंगणात होते. १,२७६ बूथवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जालन्यात अटीतटीच्या लढती झाल्या. जिल्ह्यात ४७४ ग्रामपंचायतींसाठी १२ हजार ३३२ उमेदवार रिंगणात होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अंबड तालुक्यात टोपे यांचे चुलत बंधू संभाजी टोपे व शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाध्यक्ष अॅड. भास्कर मगरे यांच्या पॅनल सदस्यांची समोरासमोर लढत झाली. उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण ४२८ ग्रामपंचायतींसाठी २,९३० उमेदवार रिंगणात होते. ३९ ग्रामपंचायती व ६८५ जागा बिनविरोध आल्यात.
लातूर जिल्ह्यातील ४०८ ग्रामपंचायतींसाठी ६ हजार ६८८ उमेदवार उभे होते. जिल्ह्यातील २५ ग्रामपंचायती बिनविरोध आल्या आहेत. केवळ लातूर तालुक्यात १३२९ उमेदवार रिंगणात होते. जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतीत १०५१ सदस्यांच्या जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. बीड जिल्ह्यातील ८४२ जागांसाठी १ हजार ९२६ उमेदवारांनी नशीब आजमावले. परभणी जिल्ह्यात ५६६ पैकी ६८ ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्यात. शुक्रवारी ४९८ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. नांदेड जिल्ह्यातील १,०१३ पैकी १०३ ग्रामपंचायती बिनविरोध आल्या. ९१० ग्रामपंचायतीत ६,८६२ जागांसाठी १५,३६० उमेदवारांनी नशीब आजमावले.
महत्वाच्या बातम्या
- विषय पंपावर : भाजप नेत्याच्या वाढदिवसानिमित्त चक्क पेट्रोल २ रुपये स्वस्त !
- तब्बल ६५ वर्षांनी निवडणूक, मात्र ग्रामस्थच काय एकाही उमेदवाराने केलं नाही मतदान !
- ‘पंतप्रधान मोदींनी आधी मीडियासमोर येऊन लस टोचून घ्यावी म्हणजे आमचाही विश्वास बसेल’
- राम मंदिर उभारणीसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोपवला तब्बल ‘इतक्या’ लाखांचा धनादेश !
- देशाच्या सर्वोच्च प्रमुखांनीही शपथपत्रात माहिती लपवली होती; पवारांकडून मुंडेंची पाठराखण !

