Share

तब्बल ६५ वर्षांनी निवडणूक, मात्र ग्रामस्थच काय एकाही उमेदवाराने केलं नाही मतदान !

Published On: 

कोल्हापूर : राज्यातील मुदत संपणार्‍या आणि लांबणीवर पडलेल्या सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली होती. यापैकी शेकडो ग्रामपंचायत निवडणूक या गावाच्या परंपरा राखत तर काही ठिकाणी पहिल्यांदाच बिनविरोध करण्यात नेत्यांना यश आलं होतं. ज्या ग्रामपंचायत या बिनविरोध झाल्या नाहीत त्या ग्रामपंचायतींमधील जागांवर आज राज्यभरात मतदान पार पडलं आहे.

यंदा गावाकडील ग्रामपंचायतींनी देखील ‘मॉडर्न पॅटर्न’ राबवल्याचं दिसून आलं. मतदानाची वेळ आता संपली असून उमेदवाराचं भवितव्य हे मतदानपेटीत बंद झालं आहे. सोमवारी म्हणजेच १८ जानेवारी रोजी मतमोजणी पार पडणार आहे. आजच्या निवडणुकांमध्ये अनेक आश्चर्यकारक गोष्टी देखील समोर आल्या आहेत.

कोल्हापुर जिल्ह्यातील पेरीड या गावात एकाही ग्रामस्थाने मतदान केलेलं नाही. इतकंच काय तर निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या उमेदवाराने देखील मतदान केलेलं नाही. पेरीड या गावात गेल्या ६५ वर्षांपासून निवडणूक लागली नव्हती. या गावातील ग्रामपंचायत ही बिनविरोध होत होती. यंदा देखील ९ पैकी ८ जागा या बिनविरोध झाल्या. मात्र, एका जागेवर दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

या वेळी देखील निवडणूक ही बिनविरोध व्हावी अशी ग्रामस्थांची इच्छा होती. मात्र, एका वॉर्डमध्ये दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले. या उमेदवारांना देखील ग्रामस्थांसोबतच राहावेसे वाटले. त्यामुळे ग्रामस्थांसह या उमेदवारांनी देखील मतदान केलं नाही. यामध्ये निवडणूक आयोगाचा निधी व वेळ खर्च झाला असून जेव्हा पुढील निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल, तेव्हा पुन्हा निवडणूक लागेल. यावेळी, ही जागा ग्रामस्थांना बिनविरोध करता येईल. यासंदर्भात एबीपी माझाने वृत्त दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!