Share

राम मंदिर उभारणीसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोपवला तब्बल ‘इतक्या’ लाखांचा धनादेश !

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : ५ ऑगस्ट २०२० रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. कोरोनाचे सावट लक्षात घेता मोजक्याच निमंत्रितांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला असला तरी जगभरातील रामभक्तांनी हा सोहळा असेल त्या ठिकाणाहून बघत या ऐतिहासिक क्षणाचा अनुभव घेतला होता.

आता, या राम मंदिराच्या प्रत्यक्ष निर्माण कार्यास देखील सुरुवात झाली आहे. तर, मंदिर उभं करण्यासाठी लागणार खर्च हा करोडो रामभक्तांमार्फत संकलित केला जाणार आहे. विश्व हिंदू परिषदेने राम मंदिर निर्माण सहयोग अभियान सुरु केले आहे. भाजपने देखील निधी संकलनासाठी सक्रिय सहभाग घेतला जात असून देशभरात हे अभियान राबविले जात आहे.

आज या मोहिमेअंतर्गत विश्व हिंदू परिषदेने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रपती कोविंद यांनी अयोध्येत भव्य मंदिर बांधण्यासाठी विश्व हिंदू परिषदेकडे 5 लाख 100 रुपयांचा धनादेश सोपवला आहे. आज विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आलोक कुमार यांच्यासह अनेक हिंदू संघटनांचे नेते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रपतींच्या निवासस्थानी दाखल झाले होते.

सगळ्या संकटांवर मात करत हजारो वर्षे मंदिर सुस्थित उभे राहील अशा खास पद्धतीने बांधकाम करणार

राम जन्मभुमी मंदिराच्या निर्माण कार्यास सुरुवात झाली आहे. CBRI रुडकी आणि आयआयटी (IIT) मद्राससोबतच L&T च्या अभियंत्यांनी मातीच्या परिक्षणाच्या काम सुरु केले आहे. मंदिराच्या निर्माणास जवळजवळ ३६-४० महिन्यांचा कालावधी लागेल असा अंदाज आहे. मंदिराच्या उभारणीत वापरल्या जाणाऱ्या दगडांना जोडण्यासाठी तांब्याचा उपयोग केला जाणार आहे. १८ इंच उंच, ३ मिमी खोली आणि ३० मिमी जाडी असलेल्या १० हजार ताब्याच्या चकत्यांची आवश्यकता लागणार आहे. यासाठी तांब्याच्या चकत्यांचे दान करण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

रामजन्मभुमी मंदिराचे निर्माण हे भारताच्या प्राचीन निर्माण पद्धतीने केले जात आहे. ज्यामुळे हे मंदिर फक्त हजारो वर्ष फक्त उभेच राहणार नाही तर भूकंप, वादळ यांसारख्या संकटांमुळे कोणतेही नुकसान होणार नाही. मंदिराच्या निर्णमानासाठी लोखंडाचा उपयोग केला जाणार नाही, अशी माहिती राम मंदिर निर्माण ट्रस्टने दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!