🕒 1 min read
नागपूर : गेली तीन वर्षे मेगा भरती रखडली आहे. अनेकदा जम्बो भरतीची घोषणा करण्यात आली पण काही ना काही कारणास्तव ही भरती रखडल्याचं दिसून येत आहे. काही महिन्यांपूर्वी १२ हजारांपेक्षा जास्त पोलीस दलातील भरतीची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली होती.
मात्र, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे मराठा समाजाने या भरती प्रक्रियेस तीव्र विरोध केला होता. जो पर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत या भरतीस स्थगिती द्यावी अन्यथा मराठा समाजातील उमेदवारांसाठी जागा राखीव ठेवण्यात यावी अशी मागणी मराठा समाजातर्फे करण्यात अली होती.
मराठा समाजातील युवकांसाठी जागा राखीव ठेवण्याच्या पर्यायाची देखील सरकारतर्फे चाचपणी करण्यात आली होती. आता या भरती प्रक्रियेबाबत अनिल देशमुख यांनी पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. महाराष्ट्र पोलीस दलात १२५३८ जागा भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची महत्त्वाची घोषणा त्यांनी केली आहे. तर, या मेगा भरतीतील पहिल्या ५२९७ जागांच्या भरती प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहितीही त्यांनी दिली.
लवकरात लवकर मेगा भरती घेण्यात यावी यासाठी ओबीसी समाज आग्रही आहे. युवकांना रोजगाराचा प्रश्न भेडसावत असून इतरही समस्यांना त्यांना सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे रखडलेली भरती प्रक्रिया त्वरित घेण्यात यावी यासाठी ओबीसी समाजातर्फे निदर्शनं देखील करण्यात आले होते. आज पोलीस भरतीच्या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने नागपूरमध्ये घंटानाद आंदोलन केले. यानंतर, अनिल देशमुख यांच्या घरी आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्यामध्ये बैठक पार पडली.
यावेळी, सुरुवातीला १२ हजार ५३८ जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल व गरज पडल्यास येत्या 4 महिन्यात 20,000 जागा भरल्या जाणार, असे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिल्याचे बबनराव तायवाडे यांनी सांगितले. यासंदर्भात न्यूज १८ लोकमतने वृत्त दिलं आहे.
राज्य शासनाने पोलीस दलात शिपाई संवर्गातील १२,५३८ पदे भरण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात ५,२९७ पदांची भरती केली जाईल. याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. त्यानंतर लवकरच भरतीचा दुसरा टप्पाही पूर्ण केला जाईल. pic.twitter.com/8MPhD1FVps
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) January 11, 2021
महत्वाच्या बातम्या
- ‘ठाकरे सरकारने महाराष्ट्रात देखील कोविडची लस सर्वसामान्यांसाठी मोफत उपलब्ध करून द्यावी ‘
- काही नेत्यांना सेक्युरिटीची हौस; अब्दुल सत्तारांचा भाजप नेत्यांना टोला
- काम कसे करायचे हे घरबशा मुख्यमंत्र्यांना सांगा,सल्ल्याची गरज त्यांना जास्त आहे : भातखळकर
- विरूष्काच्या घरी ‘लक्ष्मी’चं आगमन !
- औरंगाबाद मनपाचा ढिसाळ कारभार, ‘या’ रुग्णालयांना नोटीसही नाही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
