🕒 1 min read
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या चाहत्यांसाठी आता एक खुशखबर समोर येत आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा २०१७ मध्ये विवाह बंधनात अडकल्यानंतर चाहत्यांना लागलेली नव्या पाहुण्याच्या आगमनाची चाहुल अखेर आता पूर्ण झाली आहे.
विराटने सोशल मीडियामार्फत सर्वांना ही गोड बातमी सांगितली आहे. ‘आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की, आज दुपारी आम्हाला मुलगी झाली. आम्ही आपल्या प्रेमाबद्दल मनापासून आभारी आहोत. अनुष्का आणि आमची मुलगी दोघीही ठीक आहेत. आमचं सौभाग्य आहे की जीवनाचा हा चॅप्टर आम्हाला अनुभवता आला. आता आम्हाला थोडी प्रायव्हसीची गरज आहे’ असं आवाहन देखील त्याने केलं आहे.
— Virat Kohli (@imVkohli) January 11, 2021
विराट हा फिटनेस फ्रिक आहे हे सर्व चाहत्यांना माहीतच आहे. विराटच्या या कडक शेड्युलचे अनुष्काने गरोदरपणात देखील पालन केल्याचं अनेकदा समोर आलं होतं. कधी ती योग करतानाचे तर कधी वर्कआउट करतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून गरोदरपणातील योग्य शारीरिक काळजीसाठी जागृती देखील करण्याचा प्रयत्न केला होता.
अनुष्काने एका मुलाखती दरम्यान सांगितलं होतं की, ‘विराटने बाळाला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही याबाबत खूप विचार केला. आम्ही आमचं बाळ वाढताना लोकांना दाखवण्याची इच्छा नाही. आम्ही आमच्या मुलांना सोशल मीडियात अडकवू इच्छित नाही. पुढे जाऊन त्याचा निर्णय मुलं घेतील. आजकाल मोठ्यांनाच सोशल मीडिया हँडल करण्यात इतकी समस्या येते. हे थोडं कठीण असेल पण आम्ही हे फॉलो करु.’
महत्वाच्या बातम्या
- ‘ठाकरे सरकारने महाराष्ट्रात देखील कोविडची लस सर्वसामान्यांसाठी मोफत उपलब्ध करून द्यावी ‘
- काही नेत्यांना सेक्युरिटीची हौस; अब्दुल सत्तारांचा भाजप नेत्यांना टोला
- काम कसे करायचे हे घरबशा मुख्यमंत्र्यांना सांगा,सल्ल्याची गरज त्यांना जास्त आहे : भातखळकर
- बर्ड फ्लूसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक
- औरंगाबाद शहरात ‘ती’ सुरक्षित आहे का?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
