Share

राणा दाम्पत्य म्हणजे नाटक कंपनी; शिवसेनेच्या माजी खासदाराची घणाघाती टीका

Published On: 

🕒 1 min read

अमरावती : बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा आणि शिवसेना नेते व अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. मात्र आता हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

सिटी को-ऑप बँकेच्या मुंबईमध्ये 13-14 शाखा आहेत. या बँकेत 900 खातेदार आहेत. ही बँक बुडण्यास अनधिकृतरित्या वाटलेली कर्ज कारणीभूत असल्याचा आरोप रवी राणांनी नुकताच केला.

आनंदराव अडसूळांनी बँकेची प्रॉपर्टी भाड्यानं दिली. आता खातेदारांना केवळ 1 हजार एवढी रक्कम मिळत आहे. मराठी मतांवर राजकारण करणाऱ्यांनीच मराठी लोकांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप रवी राणांनी केला.

रवी राणा यांनी काही दिवसांपूर्वी अडसूळविरोधात ईडी कार्यालयात कागदपत्रे सादर करून चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावर आता आनंदराव अडसूळ यांनी उत्तर दिले आहे.

आनंदराव अडसूळ यांनी राणा दाम्पत्याला नाटक कंपनी म्हटले आहे.जातप्रमाणपत्राचे प्रकरण आपल्या विरुद्ध जाणार यांची कल्पना त्यांना आहे. तसेच निवडणूकीमध्ये जास्त प्रमाणात केलेला खर्च हा नियमबाह्य त्यामुळे आमदारकी सुद्धा धोक्यात आहे. त्यामुळे खासदारकी व आमदारकी जाणार या भीतीने ते चिलबिल झाले आहेत, आणि राहिला प्रश्न सिटी को-ऑप बँकेत घोटळा यामध्ये मी स्वता तक्रार केली असून त्याच्या सर्व चौकशीसाठी मी समोर जाण्यास तयार आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी अडसूळ यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!