🕒 1 min read
मुंबई : भाजपासोबतची युती तुटल्याने मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेसमोर खूप मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आतापासूनच मुंबई महापालिका जिंकण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
शिवसेनेने यासाठी अमराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ असं म्हणत शिवसेनेने गुजराती मतदारांना साद घातली आहे. दरम्यान एका बाजूला भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे तर दुसऱ्या बाजूला शिवसेना देखील अमराठी मतांसाठी जोरदारपणे तयारीला लागली आहे.
विशेष म्हणजे शिवसेनेकडून यासाठी गुजरातींसाठी मेळावा आयोजित करण्यात आला असून त्याला ही अशी टॅगलाईन वापरण्यात आली आहे. शिवसेना संघटक हेमराज शाह यांच्यावर गुजराती मतदारांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कधीकाळी मित्रपक्ष असलेल्या भाजपने शिवसेनेच्या या बदलत्या भूमिकेवर खोचक टीकास्त्र सोडलं आहे.
भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर अत्यंत बोचरी टीका केली. ‘अंबानी, अदानी, शहा, मेहता,पारिख यांना शिव्या देणाऱ्या (व त्यांच्याकडे नोकर म्हणून जागा मिळेल का? याकडे तोंडात लाळ येईपर्यंत आशाळभूत नजरेने पहाणाऱ्या) तमाम गुजराथी द्वेष्ट्या inferiority complex ने ग्रस्त शेणकिड्यांना,ज्यांची ते वेठबिगारी करतात त्या मालकाकडून सप्रेम जलेबी-फाफडा’ असं ट्विट त्यांनी केलं आहे.
अंबानी,अदानी,शहा, मेहता,पारिख यांना शिव्या देणाऱ्या (व त्यांच्याकडे नोकर म्हणून जागा मिळेल का? याकडे तोंडात लाळ येईपर्यंत आशाळभूत नजरेने पहाणाऱ्या) तमाम गुजराथी द्वेष्ट्या inferiority complex ने ग्रस्त शेणकिड्यांना,ज्यांची ते वेठबिगारी करतात त्या मालकाकडून सप्रेम#जलेबी_फाफडा pic.twitter.com/pzIMy9JQNi
— Avadhut Wagh अवधूत सुशीला रमाकांत वाघ (@Avadhutwaghbjp) January 5, 2021
महत्वाच्या बातम्या
- कौतुक तर होणारचं ! आजारी असलेल्या माजी कर्मचाऱ्याची भेट घेण्यासाठी टाटांनी थेट गाठलं पुणे
- शिवसेना म्हणजे नौटंकी सेना आहे; फडणवीसांची बोचरी टीका
- अखेर प्रतीक्षा संपली, कोरोना लसीकरणाचा मुहूर्त ठरला !
- सीरम विरुद्ध भारत बायोटेक : अखेर कोरोना लस उत्पादक कंपन्यांमधील वादावर पडदा
- संजय राऊत भाजपला सुरुंग लावण्याच्या तयारीत; राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
