Share

बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांना मिळणार ‘हि’ सुविधा

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : बँकिंग क्षेत्रात रोज नवनवीन बदल होत असतात यामध्ये ऑनलाईन बँकिंग मुले तर अमुलाग्रबदल झाले. यामध्ये लॉकडाऊनमध्ये या बँकिंग प्रणालीचा सर्व जास्त वापर केला गेला त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन व्यवहार अत्यंत सोयीस्कर झाले. या पार्श्वभूमीवर ग्राहकांना आणखी सहज बँक व्यवहार करता यावे यासाठी बँक ऑफ बडोदाने आता एक नवीन सुविधा आणली आहे.

व्हॉट्सअ;ॅप या सोशल मिडिया प्लाटफॉर्म ने आता ऑनलाईन पेमेंट क्षेत्रात देखील पदार्पण केले आहे. त्यामुळे गुगल पे, पे टीएम, फोन पे प्रमाणेच पेमेंटची सुविधा देऊ करणार आहे. यासाठी व्हॉट्सअ;ॅप ला अपडेट करण्यात आले असून व्हॉट्सअ;ॅप च्या सुरक्षिततेसाठी देखील महत्वच्या गोष्टी समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

त्यांनतर आता बँक ऑफ बडोदाने आपल्या खातेदारांना नववर्षात गुडन्यूज दिली आहे. बँकेने व्हॉट्सअ;ॅप बँकिंग सिस्टम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातल्या सरकारी बँकेपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या व्हॉट्सअ;ॅप बँकिंग सर्व्हिसचा अनेक ग्राहकांना फायदा होणार आहे.

खातेदार आता व्हॉट्सअप सर्व्हिसद्वारे बँकेतील शिल्लक रक्कम तसेच चेकची सद्यस्थिती घरबसल्या मोबाईलवरुन जाणून घेऊ शकतात. त्याचबरोबर पाठीमागच्या काही दिवसांताली मिनी स्टेटमेंटही घेऊ शकतात. याशिवाय चेकबुकसाठी बँकेकडे ऑनलाईन रिक्वेस्टही पाठवू शकतात.

बँक नियमाच्या अनुसार, सर्वांत पहिल्यांदा आपल्या मोबाईलमध्ये ‘8433 888 777’ हा नंबर सेव्ह करावा लागेल. या व्हॉट्सअॅप नंबरवर इंग्रजी अक्षरात ‘HI’ मेसेज करावा लागेल. या नंबरवर व्हॉट्सअ;ॅप द्वारे बँकेच्या सेवा महिन्याच्या सगळ्या दिवशी अगदी चोवीस तास उपलब्ध असतील, असं बँकेच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

“बँकेच्या खातेदारांना सर्वोत्तम सुविधा देण्यास बँक कटिबद्ध आहे. बँकेच्या व्हॉट्सअ;ॅप सर्व्हिसचा बँकेच्या अनेक खातेदारांना फायदा होणार आहे. या आणि अशाचप्रकारच्या सुविधा खातेदारांना देण्यासाठी बँक नेहमीच प्रयत्न करेल”, तर “सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे बँकेने ग्राहकांना चांगल्या ऑनलाईन सुविधा देण्याचं ठरवलं आहे. व्हॉट्सअ;ॅप बँकिंगच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या बँकिंग गरजा घरातूनच पूर्ण करता येतील”, असंही ए.के.खुराना यांनी सांगितलं.

यामध्ये ग्राहकांना बॅलन्स इनक्वायरी (Balance Inquiry), मिनी स्टेटमेंट (Mini Statement), चेक स्टेटमेंट (Check Statement), चेक बुक रिक्वेस्ट (Cheque Book request). व्हॉट्सअ;ॅप बँकिंगमध्ये कोणकोणत्या सुविधा मिळणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!