Share

लक्षात येतेय का थयथयाटाचे कारण? भाजप नेत्याचा राऊतांवर हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनेचे दिग्गज नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवली आहे. वर्षा राऊत यांनी पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली आहे. यानंतर राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे.

एनएआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृतानुसार, ईडीने पीएमसी बँक घोटाळ्यात प्रवीण राऊत यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणामध्ये प्रवीण राऊत यांच्याकडे 72 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचा दावा ईडीने केला आहे. हा व्यवहार मनी लाँड्रिंग कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हणत ही संपत्ती ईडीने जोडली आहे. दरम्यान, ही मालमत्ता ईडीने जप्त केल्याचं वृत्त टीव्ही ९ मराठीने दिले आहे.

संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या अकाउंटमधून काही व्यवहार वर्षा राऊत यांच्या अकाऊंटमध्ये झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुमारे ५५ लाखांचा व्यवहार झाल्याचे त्यांचा अकाउंटवरून समजते. अशातच आता ईडीने प्रवीण राऊत यांच्याबाबत कठोर पाऊल उचललं असतानाच संजय राऊत यांच्या पत्नीच्या अडचणीत देखील वाढ होईल अशी शक्यता आहे.

याच वरून भाजप नेत्यांनी पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. ‘प्रकरण 55 लाखांवरून 72 कोटींवर गेले आहे… लक्षात येतेय का थयथयाटाचे कारण???’ असं ट्विट भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केलं आहे. त्यांचा रोख हा संजय राऊत व त्यांच्या पत्नी वर्ष राऊत यांच्या अकाउंटवरील संशयास्पद व्यवहारांवर असल्याचं दिसून येतंय.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!