नवी दिल्ली: अद्यायावत तंत्रज्ञाच्या काळात इंटरनेट वरील सर्च इंजिन मध्ये नेहमीच नवनवीन बदल होतात. यामध्ये सुरुवतीला टाईप करून आपल्याला हवी असलेली माहिती मिळवता येत होती. त्यांनतर संभाषण व्यासपीठ म्हणजेच इंतेराक्टीव्ह प्लाटफॉर्म अलेक्सा, गूगल असिस्टंटला यांच्या सहायाने सर्चिंग अगदी सोपे झाले. तुमच्या केवळ बोलण्याने हे टूल तुम्हाला हवी असणारी माहिती देतात. मात्र यासठी सध्या केवळ इंग्रजी भाषेचा वापर केला जातो.
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाचा राष्ट्रीय ई-शासन विभागाने या एआय-आधारित इंतेराक्टीव्ह प्लाटफॉर्म अलेक्सा, गूगल असिस्टंटला’ प्रादेशिक भाषांमध्ये सेवा देण्याचे आदेश दिले आहेत. योग्य माहिती आणि वापरकर्त्यांना वैयक्तिकृत अनुभव देण्यासाठी डेटा संकलित करून विश्लेषण करण्यात यावे असा या मागचा उद्देश आहे.
ई-गव्हर्नन्स सेवा जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सरकारने शुक्रवारी अ;ॅमेझॉनचा अलेक्सा किंवा गूगल असिस्टंट सारख्या चॅट बॉट किंवा व्हॉईस वर आधारित सिस्टीम विकसित करण्यासाठी या बिडला आमंत्रित केले होते. तर या सेवा उमंग प्लॅटफॉर्मवर देखील देण्यात येतील. जेणे करून नागरिकांना सरकारी योजनांची माहिती देखील या साधनांचा वापर करून सुलभपने शोधता येयील.
एनजीडीने प्री-बिड परिषदेसाठी 12 जानेवारी आणि बिड सबमिशनच्या अंतिम तारखेसाठी 25 जानेवारीची तारीख निश्चित केली आहे. बिड 27 जानेवारी रोजी उघडल्या जातील, मूल्यमापन 5 फेब्रुवारीपर्यंत होईल आणि कागदपत्रानुसार फेब्रुवारीच्या दुसर्;या आठवड्यात वर्क ऑर्डर देण्यात येणार आहे. या प्रकल्पाची मुदत प्रत्यक्षात आल्यापासून चार वर्षे असेल.
महत्वाच्या बातम्या
- बांधकाम विभागातील बिल घोटाळ्याची चौकशी न केल्यास न्यायालयात जाऊ-अतुल भातखळकर
- सोनू सूद उतरणार राजकारणाच्या मैदानात?
- अजितदादा, आमच्याकडे चहाला या; फडणवीसांनी दिलं खास आमंत्रण
- सभागृहात पवार-फडणवीस एकाच मंचावर, तर बाहेर दोन्ही पक्षांच्या समर्थकांची हुल्लडबाजी
- बॉलिवूड एंट्री अगोदरच रश्मिका मंदाना महागली; एका चित्रपटासाठी घेणार इतके मानधन


