🕒 1 min read
ऑस्ट्रेलिया : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान मेलबर्न इथं सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं यजमान संघावर ८ गडी राखून विजय मिळवला. यासह चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने १-१ ची बरोबरी साधली आहे. सात जानेवारीपासून तिसरा कसोटी सामना होणार आहे. त्यानंतर अखेरचा व चौथा कसोटी सामना हा ब्रिस्बेन येथे १५ जानेवारीपासून खेळवण्यात येणार आहे.
सात जानेवारीपासून तिसरा कसोटी सामना सिडनीमध्ये होणार आहे. सिडनीला पोहचण्यापूर्वी भारतीय खेळाडू मेलबर्न येथेच सराव करत आहेत. त्याशिवाय मोकळ्या वेळेत मेलबर्न मार्टेकमध्ये किंवा हॉटेलमध्ये स्थानिक जेवणाचा आनंद घेत आहेत. सोमवारी रोहित शर्मा, ऋषभ पंत, शुभमन गिल आणि नवदीप सैनी मेलबर्नमधील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचे जेवणाचे बिल चक्क एका चाहत्याने भरले होते. याबद्दल या चाहत्यानेच खुलासा केला होता. मात्र आता हे प्रकरण भारतीय खेळाडूंच्या अंगलट येऊ शकते.
Bhookh nai h so ye order kar diya h taaki inko dekhta rahu ???????????????? pic.twitter.com/cvr3Cfhtl7
— Navaldeep Singh (@NavalGeekSingh) January 1, 2021
झाले असे की भारतीय संघातील रोहित शर्मा, शुबमन गिल, रिषभ पंत आणि नवदीप सैनी असे काही खेळाडू मेलबर्नमध्ये एका हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. दरम्यान त्याच ठिकाणी भारतीय संघाचा नवलदीप सिंग हा चाहताही आपल्या पत्नीसह आला होता. त्याला या क्रिकेटपटूंना पाहून इतका आनंद झाला की त्याने त्यांचे बिलही भरुन टाकले, तसेच नंतर क्रिकेटपटूंनी आग्रह करुनही बिलाचे पैसे त्याने घेतले नाही. त्यामुळे त्याचे प्रेम पाहून पंतने त्याला मिठी मारली, असा दावा या चाहत्याने ट्विटरवर केला. याबरोबरच चाहत्याने क्रिकेटपटूंचे फोटोही काढले.
When they got know that i have paid the bill.. Rohit sharma said bhaji pese lelo yaar acha nai lagta.. i said no sir its on me. Pant hugged me and said photo tabhi hogi jab pese loge wapis. I said no bro not happening. Finally sabane photo khichwai 🙂 mja aa gya yaar #blessed
— Navaldeep Singh (@NavalGeekSingh) January 1, 2021
नवलदीपने ट्विटरवर त्याचा संपूर्ण अनुभव सांगितला आहे. मात्र आता त्याचमुळे भारतीय क्रिकेटपटूंना ही गोष्ट महागात पडण्याची शक्यता आहे. कारण ऑस्ट्रेलिया आणि भारत संघाचे खेळाडू सध्या जैव सुरक्षित वातावरणात आहेत. त्यामुळे त्यांना काही बंधने लावण्यात आली आहेत. याच कारणामुळे दुसरा कसोटी सामना संपेपर्यंत स्टिव्ह स्मिथही त्याच्या पत्नीला भेटू शकला नव्हता.
खेळाडूंना जैव सुरक्षित वातावरणात बाहेर जाण्याची आणि खाण्याची व वस्तू विकत घेण्याची परवानगी आहे मात्र त्यांना सोशल डिस्टसिंग न पाळता चाहत्यांना भेटण्याची परवानगी नाही. मात्र, नवलदीपने त्याच्या ट्विटमध्ये केलेल्या दाव्यानुसार पंतने त्याला मिठी मारली. त्यामुळे कदाचीत जैव सुरक्षित वातावरणाच्या नियमाचा भंग झाला असल्याची शक्यता वर्तवली जात असून सध्या क्रिकेट ऑस्ट्रेलिया या प्रकरणाचा तपास करत आहे, असे वृत्त डेली टेलिग्राफने दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- बांधकाम विभागातील बिल घोटाळ्याची चौकशी न केल्यास न्यायालयात जाऊ-अतुल भातखळकर
- सोनू सूद उतरणार राजकारणाच्या मैदानात?
- अजितदादा, आमच्याकडे चहाला या; फडणवीसांनी दिलं खास आमंत्रण
- सभागृहात पवार-फडणवीस एकाच मंचावर, तर बाहेर दोन्ही पक्षांच्या समर्थकांची हुल्लडबाजी
- बॉलिवूड एंट्री अगोदरच रश्मिका मंदाना महागली; एका चित्रपटासाठी घेणार इतके मानधन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
