Share

चाहत्याने भरलं रोहित, गिल आणि पंत यांच्या जेवणाचं चक्क ‘इतकं’ बिल

Published On: 

🕒 1 min read

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान मेलबर्न इथं सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं यजमान संघावर ८ गडी राखून विजय मिळवला. यासह चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने १-१ ची बरोबरी साधली आहे. सात जानेवारीपासून तिसरा कसोटी सामना होणार आहे. त्यानंतर अखेरचा व चौथा कसोटी सामना हा ब्रिस्बेन येथे १५ जानेवारीपासून खेळवण्यात येणार आहे.

सात जानेवारीपासून तिसरा कसोटी सामना सिडनीमध्ये होणार आहे. सिडनीला पोहचण्यापूर्वी भारतीय खेळाडू मेलबर्न येथेच सराव करत आहेत. त्याशिवाय मोकळ्या वेळेत मेलबर्न मार्टेकमध्ये किंवा हॉटेलमध्ये स्थानिक जेवणाचा आनंद घेत आहेत. सोमवारी रोहित शर्मा, ऋषभ पंत, शुभमन गिल आणि नवदीप सैनी मेलबर्नमधील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते.

त्याचवेळी एका चाहत्यानं त्यांना पाहिलं. खेळाडूंच्या जवळच्या टेबलवरच चाहता बसला होता. त्याने या खेळाडूंचा छोटा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला. या चाहत्याचे नाव नवलदीप सिंग आहे. नवलदीप सिंग यानं सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त केला. आपल्या आवडत्या खेळाडूंना आणखी काही वेळ पाहाता यावं यासाठी स्वत:साठी अतिरिक्त डिशही मागवली.

तसेच त्याने नंतर चक्क भारतीय क्रिकेटपटूंच्या जेवणाचे बिलही भरले. बिल भरल्याचं सुरुवातीला क्रिकेटपटूंना माहित नव्हते. याबाबत त्याने ट्विटरवरुन माहिती दिली आहे. बिल 118.69 डॉलर एवढे आले होते. हे सर्व बिल नवलदीप सिंग यांनी भरलं.

आपलं हॉटेलमधील बिल भरल्याचं रोहित शर्मा आणि इतर क्रिकेटपटूंना समजलं तेव्हा सर्वजण नवलदीप सिंगला भेटले. रोहित त्याला म्हणाला…’पैसे घे रे असं चांगल वाटत नाही.’ ऐकणान तो चाहता कसला.. त्यावर नवलदीप रोहितला नाही म्हणाला… पंतने नलदीपला मिठी मारली आणि म्हणाला, ‘आम्ही तुझ्याबरोबर फोटो तेव्हाच काढू जेव्हा तू पैसे घेशील.’ पण या चाहत्याने त्यांच्याकडून पैसे घेण्यास नकार दिला. अखेर सर्वांनी त्याच्याबरोबर फोटो काढले.

दुसऱ्या कसोटी सामन्यात उमेश यादव जखमी झाला होता. तसेच तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी रोहित शर्माके उपकर्णधारपद सोपवलं. त्यामुळे सिडनी कसोटी सामन्यात भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!