Share

नथुराम गोडसेबाबत तुमचं मत काय आहे? ओवैसींचा भागवत यांना सवाल

Published On: 

नवी दिल्ली : एखादी व्यक्ती हिंदू असेल तर ती आपोआप देशभक्तच असते, कारण ही बाब त्याचे चरीत्र आणि स्वभाव असते असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. महात्मा गांधी यांनी म्हटले होते की त्यांची देशभक्ती ही त्यांच्या धर्मातून निर्माण झाली आहे. त्यांच्या याच विधानाचा आधार घेत सरसंघचालकांनी हे विधान केले आहे.

जे.के.बजाज आणि एम.डी.श्रीनिवास यांनी लिहिलेल्या ‘मेकिंग ऑफ अ हिंदू पॅट्रीअट’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्या निमित्ताने सरसंघचालकांनी हे उद्गार काढले आहेत.स्वधर्म आणि देशभक्तीचा उल्लेख करत सरसंघचालक पुढे म्हणाले,हिंदू आहे म्हणजे तो देशभक्त असणार. तो निद्रीस्त असू शकतो, त्याला जागं करायला हवं पण कोणताही हिंदू भारतविरोधी असू शकत नाही असं देखील ते म्हणाले.

महात्मा गांधींनी ‘हिंद स्वराज’मध्ये मांडलेल्या विचारांचा वेध घेताना, धर्म आणि देशभक्ती यांच्या परस्पर संबंधांवर भाष्य केले आहे. महात्मा गांधी हे हिंदू देशभक्त होते, अशी मांडणी करताना गांधीजींचे विचार, लिखाण, भाषणे आदींचे साह्य़ घेतले गेले आहे. ‘हिंदू हा देशभक्त असतोच. देशभक्त असणे हे हिंदूंच्या नसानसात भिनलेले असते. हिंदू भारतद्रोही असू शकत नाही’, अशी ‘हिंदू देशभक्त’ या शब्दाची भागवत यांनी उकल केली.

दरम्यान, भागवत यांच्या वक्तव्यावरून एमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे. तसंच गोडसेबाबत तुमचं मत काय आहे? असा सवालही केला आहे.गांधीजींची हत्या करणाऱ्या गोडसेबद्दल काय? याचं उत्तर मोहन भागवत देतील का? नेल्ली येथे झालेल्या हत्याकांडाबाबत, तसंच १९८४ मधील शीख विरोध आणि २०२० मधील घटनेबद्दल काय विचार आहेत?,असे सवाल ओवेसी यांनी मोहन भागवत यांना केले आहेत. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांना प्रश्न विचारले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!