🕒 1 min read
मुंबई : ईडी चैकशीवरून सध्या महाराष्ट्रातील वातावरण तापलं आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीने समन्स बजावल्यानंतर शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्ष राऊत यांना देखील ईडीने समन्स बजावला आहे.
या नोटीशीनंतर आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण तापलं आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपच्या नेत्यांवर अत्यंत तिखट शब्दात टीकास्त्र सोडण्यात आलं होतं. ‘हवाबाण थेरपीचा अतिरेक झाला की मेंदूत सडकी हवा जाते. त्या पादऱ्या हवेच्या ढेकरा सध्या ज्यांना लागत आहेत त्यांचे नाव भाजप ! भाजपच्या नव्या घटना समितीचा विजय असो ! डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण ! हेच तुमचे भविष्य !’ अशी टीका सामनातून करण्यात आली होती.
ही टीका भाजपच्या जिव्हारी लागली असून आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी व सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांच्याकडे या आक्षेपार्ह भाषेसंदर्भात तक्रार करणार आहेत. “सामनातून माझ्यावर गलिच्छ भाषेत अग्रलेख लिहिला होता. आताही संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यावर जी भाषा वापरली त्याबाबत मी रश्मी वहिनींना पत्र लिहिणार आहे. तुम्ही ‘सामना’च्या संपादिका आहात, म्हणजे हा अग्रलेख तुमच्या नावाने लागतो. ही तुमची भाषा असू शकत नाही. मग अग्रलेखात ही भाषा कशी? असा प्रश्न त्यांना विचारणार आहे.” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटलांच्या या तक्रारीला शिवसेनेचे नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘सामना’मधून मला वाटत नाही कोणती गलिच्छ टीका होते. ‘सामना’ची विशिष्ट शैली आहे, सामना ब्रँड आहे आणि ती ठाकरे शैली आहे. त्या ब्रँडला साजेशी भाषाच लिहिली जाते. ती भाषा गलिच्छ नसते,’ असं म्हणत परब यांनी पाटलांच्या आरोपांचं खंडन केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाचे संकट दूर होऊ दे; दगडूशेठ गणपतीला भाविकांचं साकडं
- ‘नवीन वर्ष तुमच्याशिवाय पण…’ इरफान खानच्या मुलाची भावुक पोस्ट
- रश्मी वहिनी, ‘सामना’तील ही भाषा चुकीची!, चंद्रकांतदादांची तक्रार
- साईनगरीत भाविकांकडून बाबांचे दर्शन घेऊन नव्या वर्षाचे स्वागत
- कसोटी सामन्यात उमेश यादवच्या जागी टी नटराजनला संधी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
