🕒 1 min read
पुणे : कोरोना परिस्थितीमुळं भारतातही नववर्षाचं स्वागत साधेपणानंच करण्यात आलं. राजधानी दिल्लीमध्ये कोणत्याही कार्यक्रमांचं आयोजन करण्यास परवानगी नव्हती. इथं रात्रीची संचारबंदीही लागू होती. मुंबईसह महाराष्ट्रात नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करत साधेपणानं नवीन वर्षाचं स्वागत केलं.
मुंबईत काल गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह अशा ठिकाणी आलेले लोक रात्री 11 च्या आत घरी परतले. बंगळूर, पुणे आणि मुंबईत जमावबंदीचे आदेश देण्यात आले होते. गोव्यात मात्र आतषबाजी करत पर्यटक आणि स्थानिकांनी नववर्षाचं स्वागत केलं.
केरळमध्ये विविध कार्यक्रमांना नागिरकांचा थंडा प्रतिसाद मिळाला. कोलकत्यात पोलिसांनी विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना मास्कचं वाटप केलं. पंजाबमध्ये नागरिकांनी अमृतसरमधल्या सुवर्ण मंदिराला भेट देत नव वर्षाची सुरुवात केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नवीन वर्ष जनतेला आरोग्यदायी, आनंदाचं आणि समृद्धीचं जावो, अशी इच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केली.
दरम्यान, खासदार शरद पवार यांनी देखील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. एक आव्हानात्मक वर्ष मागे सारून नववर्षाच्या स्वागतासाठी आपण सज्ज झालो आहोत. गतवर्षाने आपल्याला नियमांचे पालन करण्याची,स्वच्छतेची, आरोग्याची काळजी घेण्याची शिकवण दिली. या गोष्टींचा अंगीकार करून नव्या उत्साहाने, नव संकल्पांसह नववर्षाचे स्वागत करूया. नूतन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा!असं पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- नवीन वर्ष आरोग्य क्षेत्रातल्या आव्हानांवर मात करणारं असेल : मोदी
- पुण्यातील आयटी नगर परिसरात गव्याचा वावर
- सुनील गावसकर यांच्या मते, सिडनी कसोटीत रोहितसोबत ‘या’ खेळाडूने करावी ओपनिंग
- पुणेकरांसाठी खुशखबर : PMPML च्या ताफ्यात दाखल होणार नव्या १५० ई-बसेस!
- शपथ घेण्याआधीच नवनिर्वाचित खासदाराचा झाला कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
