🕒 1 min read
ऑस्ट्रेलिया : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान मेलबर्न इथं सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं यजमान संघावर ८ गडी राखून विजय मिळवला. यासह चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने १-१ ची बरोबरी साधली आहे. सात जानेवारीपासून तिसरा कसोटी सामना होणार आहे. त्यानंतर अखेरचा व चौथा कसोटी सामना हा ब्रिस्बेन येथे १५ जानेवारीपासून खेळवण्यात येणार आहे.
दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला रोहित शर्मा या सामन्याचा भाग असणार आहे. अशात बॉक्सिंग डे कसोटीत खराब कामगिरी केलेल्या सलामीवीर मयंक अगरवालला तिसऱ्या सामन्यातून डच्चू मिळू शकतो. माजी भारतीय फलंदाज सुनिल गावसकर यांनी याविषयी त्यांचे मत मांडले आहे.
गावसकर यांच्या मते सिडनी क्रिकेट ग्राउंडवर होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात रोहितसोबत मयंकनेच सलामीला फलंदाजीसाठी जावे. सोनी चॅनलच्या स्पोर्ट्स शो मध्ये ते बोलत होते. गावसकर म्हणाले की, ‘माझ्या मते सिडनीत होणाऱ्या कसोटी सामन्यात रोहितसोबत मयंकने सलामीला फलंदाजीला जावे. मला माहिती आहे की, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आतापर्यंत त्याचा फॉर्म चांगला राहिला नाही. पण तो एक शानदार खेळाडू आहे आणि त्याला रोहितसोबत सलामीला फलंदाजी करण्याची संधी देण्यात यावी.’
महत्वाच्या बातम्या
- नवीन वर्षात मीडियापासून लांब राहण्यासाठी दिपीकाने सोशल अकाऊंटवरील पोस्ट केल्या डिलीट
- धनंजय मुंडेंचा धडाकेबाज निर्णय अन् ‘त्या’ दोन्ही सावित्रीच्या लेकी आता शिकणार थेट परदेशात !
- रामदास आठवलेंनी कवितेतून दिल्या नवीन वर्षाच्या हटके शुभेच्छा !
- ‘वंडर वुमन’ची बिलकीस दादीला भेटण्याची इच्छा
- चारचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरू होणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
