Share

वडिलांनी मतदारांना दिलेला शब्द मुलगा करणार पूर्ण, भगीरथ भालके पूर्ण करणार भारतनानांचे स्वप्न !

Published On: 

सोलापूर : राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांनी पंढरपुरात सर्व सोयी सुविधायुक्त सुसज्ज असे क्रीडा संकुल निर्माण करू असा शब्द मतदारांना दिला होता. त्यांनी दिलेल्या या शब्दाची दखल घेत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके यांनी पुढाकार घेतला आहे. यासंबंधी त्यांनी मंगळवारी मुंबई येथे क्रीडा मंत्री सुनील केदार यांची भेट घेत पंढरपुरात क्रीडा संकुल उभारणीबाबत सहकार्य करण्याबाबत चर्चा केली.

मुंबई येथे त्यांनी क्रीडा मंत्री सुनील केदार यांची भेट घेत पंढरपुरात क्रीडा संकुल उभारणीबाबत सहकार्य करण्याबाबत चर्चा केली असता क्रीडामंत्री सुनील केदार यांनी तात्काळ पंढरपूर क्रीडा संकुलचा सविस्तर प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, असे सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी यांना दूरध्वनीवरून दिले आहेत.

सोलापूर जिल्हा किल्ला अधिकाऱ्यांना सूचना देत पंढरपुरातील क्रीडा संकुलाचा प्रस्ताव त्वरित सादर करावा असे सांगितले. तसेच, या क्रीडा संकुलाला दिवंगत आमदार भारत भालके यांचे नाव देण्यात येईल असे आश्वासनदेखील केदार यांनी चर्चेदरम्यान दिले.

भगीरथ भालके यांनी मतदार संघातील विविध प्रश्नांसाठी मुंबई येथे जयंत पाटील व इतर मंत्र्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी क्रीडामंत्री सुनील केदार यांच्या शासकीय निवासस्थानी जात त्यांना भेटून मतदारसंघातील क्रीडा संकुल याबाबत माहिती देत दिवंगत आमदार भारत भालके यांचे क्रीडा संकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण मतदारसंघातील क्रीडाप्रेमींना न्याय देण्याची भूमिका घेत मदत करावी अशी विनंती केली.

पंढरपूर शहरात क्रीडा प्रेमीसांठी बॅडमिंटन हॉल, हॉकी, कुस्ती मॅट, ट्रक आदी अनेक खेळांचे प्रशिक्षण घेण्यासाठी शासकीय सुसज्ज क्रीडासंकुल उभारण्यात येण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून या कामात भगीरथ भालके यांनी पुढाकार घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!