Share

“जनाब बाळासाहेब ठाकरे” ! शिवसेनेच्या ‘शिवशाही’ कॅलेंडरमध्ये बाळासाहेबांचा ‘जनाब’ असा उल्लेख

Published On: 

🕒 1 min read

नाशिक : शिवसेनेची महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासूनची बदलती भूमिका आणि हिंदुत्वाची कास यावरून भाजपने शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. मुंबई महापालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी कुणाचा भगवा शुद्ध यावरून देखील या दोन्ही पक्षांमध्ये चांगलाच वातावरण तापलेलं पाहायला मिळालं होतं.

तर, मंदिरांसह सर्वच धर्मियांची प्रार्थनास्थळे खुली करण्याबाबत खुद्द राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वावरचं काही प्रश्न निर्माण केल्यानंतर हा वाद अधिक पेटला होता. याचदरम्यान, मुंबईत मुस्लिम समाजातील लहान मुलांना अजानची गोडी लागावी आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून अजान पठण स्पर्धेचं आयोजन शिवसेनेच्या एका नेत्याने केली होती.

यावर देखील भाजपने शिवसेनेवर सडकून टीका केल्याचं दिसून आलं होतं. वैचारिक साम्य असलेल्या या दोन मित्र पक्षांची मैत्री वर्षभरापूर्वी संपुष्टात आल्यानंतर भाजप नेत्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल चढवला आहे. आता, भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी शिवसेनेच्या उर्दू भाषेतील दिनदर्शिकेचा फोटो शेअर करून शिवसेनेवर जळजळीत टीका केली आहे.

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख हिंदुहृदयसम्राट असा केला जातो. मात्र, या दिनदर्शिकेत त्यांचा उल्लेख ‘जनाब’ असा केला असल्याचे आचार्य भोसले यांनी निदर्शनास आणतानाच शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘हिंदुह्रदयसम्राट ते “जनाब बाळासाहेब ठाकरे” ! अजान स्पर्धेनंतर शिवसेनेच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल मा. बाळासाहेब ठाकरे मा. उद्धवजी ठाकरे यांचे त्यांच्या “खास शैलीत” अभिनंदन करत असतील !’ असा टोला त्यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!