🕒 1 min read
मेलबर्न:- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ८ विकेटनी शानदार विजय मिळवला. गोलंदाज आणि फलंदाजांनी केलेल्या धमाकेदार कामगिरीच्या जोरावर भारताने हा विजय साकारला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. बॉक्सिंग डे कसोटीत विजय मिळवण्याची भारताची ही सलग दुसरी वेळ आहे. याआधी २०१८ साली भारताने प्रथम बॉक्सिंग डे कसोटीत विजय मिळवला होता. या विजयासह भारताने २०२०मधील अखेरी लढत जिंकली आणि चाहत्यांना ३१ डिसेंबरची भेट दिली आहे.
विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे भारतीय संघाचं नेतृत्त्व होतं. रहाणेनेही त्याच ताकदीने आव्हान पेलून, आपल्या नेतृत्त्वाची चुणूक दाखवली. रहाणेने या कसोटीत शतक ठोकून, कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. त्यामुळे भारताने हा सामना 8 विकेट्स राखून जिंकला. अजिंक्य राहणे हा मुळचा अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याचा आहे. त्याने आज केलेल्या दमदार कामगिरीमुळे अहमदनगर जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे.
पहिल्या कसोटीत लाजीरवाणा पराभव, सलामीवीरांचा हरवलेला फॉर्म, मधल्या फळीतील आधारस्तंभ विराट कोहलीची अनुपस्थिती आणि शुभमन गिल, मोहम्मद सिराज यासारखे नवखे आणि पहिलीच कसोटी खेळणारे खेळाडू, या सर्व पार्श्वभूमीसह दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचं नेतृत्त्व अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आलं. कांगारुंचा जबरदस्त फॉर्म आणि त्यांचं घरचंच मैदान यामुळे भारतीय टीम आधीच बॅकफूटवर होती. मात्र याच कठीण प्रसंगात अजिंक्य रहाणेने लीडर कसा असतो, याची झलक दाखवली.
महत्वाच्या बातम्या
- फिनिक्स पक्षाप्रमाणे भारतीय संघाची ‘अजिंक्य’ भरारी !
- पुणे : भाजप नगरसेवक महेश लडकत यांचे निधन
- सरकारने निर्यात बंदी उठवताच कांद्याच्या भावात वाढ; शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण
- शेतकरी विरोधी भाजपला गावात ‘नो एन्ट्री’, गावात आले तर घातला जाणार चपलेचा हार !
- ‘ईडी : येथे भाजप विरोधातील नेत्यांना नोटीस दिल्या जातात’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
