🕒 1 min read
मुंबई : शिवसेनेचे दिग्गज नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवली आहे. वर्षा राऊत यांनी पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली. भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरलेले दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्यापाठोपाठ वर्षा राऊत यांनाही ईडीची नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
मला धमकावलं जात आहे पण मी कुणालाही घाबरत नाही मी या सगळ्यांचा बाप आहे असं म्हणत संजय राऊत यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. सरकार पाडण्यासाठी भाजपाचा कट शिजला आहे असाही आरोप संजय राऊत यांनी केला आहे. या सरकारचे जे खंदे समर्थक आहे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्रास देणं सुरु केलं आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
‘हिंमत असेल तर समोर येऊन लढावं. बायका-पोरांच्याअडून आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. आम्ही समोरासमोर लढणारे आहोत. हे सरकार पाडण्यासाठी हे सर्व सुरु असून माझं नाव संजय राऊत आहे, काय उखडायचं आहे ते उखडावं. हे प्रकरण आता भाजपला महागात पडेल,’ असा निर्वाणीचा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.
ईडीची नोटीस राऊतांच्या घरी धडकल्यामुळे शिवसेना भाजप विरोधात चांगलीच आक्रमक झाली आहे. काल, ईडी कार्यालयाबाहेर ‘भाजप प्रदेश कार्यालय’ असा बॅनर लावण्यात आला होता. हे प्रचंड व्हायरल झालं व संमिश्र प्रतिकीर्या सामान्य जनतेने दिल्या. आता शिवसैनिकांनी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यलयाबाहेर सोमवारी रात्री होर्डिंग लावले आहे. ‘Enforcement Director येथे भाजप विरोधी लोकप्रतिनिधींना नोटीस दिल्या जातात.’ या आशयाचा फलक लावण्यात आला होता. यामुळे शिवसैनिक भाजपवर घणाघात करण्यासाठी नवनव्या युक्त्या वापरत असल्याचं दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- फिनिक्स पक्षाप्रमाणे भारतीय संघाची ‘अजिंक्य’ भरारी !
- पुणे : भाजप नगरसेवक महेश लडकत यांचे निधन
- सरकारने निर्यात बंदी उठवताच कांद्याच्या भावात वाढ; शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण
- धक्कादायक : भारतात कोरोनाचा नवा स्ट्रेन दाखल, सहा जण पॉझिटिव्ह
- नववर्ष स्वागताला ‘बसायचा प्लॅन’ करत असाल तर सावधान, ‘अशी’ असेल नियमावली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
