Share

यूपीए अध्यक्षपदावरून ठाकरे सरकार कोसळेल; केंद्रातील ‘या’ मंत्र्याचा दावा

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर:- संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) च्या नेतृत्वाचा मुद्दा सध्या देशातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव या पदासाठी चर्चेत आहे.

शरद पवार यांचे नाव यूपीएच्या अध्यक्ष पदावर यावे, असे शिवसेनेचे मत असले तरी कॉंग्रेस पक्ष ते अजिबात मान्य करणार नाही. कारण राष्ट्रवादी हा महाराष्ट्रापुरता मर्यादित पक्ष आहे. शरद पवार यांच्याबाबत मला आदर आहे. पण पवार यांना यूपीए अध्यक्षपद मिळणे अशक्य आहे. कारण सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत. राहुल गांधी काँग्रेसचे नेते आहेत. त्यामुळे शरद पवार यांना यूपीए अध्यक्ष पद देण्याची संजय राऊत यांची मागणी योग्य नाही. या मुद्द्यावरून काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे सरकारचा पाठिंबा काढू शकतो. राऊत यांच्या मागणीमुळे सरकारमध्ये मतभेद होतील, व हे सरकार पडू शकते, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.

काँग्रेसने पाठिंबा काढल्यानंतर सरकार पडेल. हे सरकार पडल्यावर आम्हाला सरकार बनवण्यासाठी मार्ग मोकळा होईल. त्यासाठी कोणता पक्ष व आमदार आमच्याकडे येऊ शकतात, ते आम्ही पाहू व बहुमत सिद्ध करून दाखवू, असे आठवले म्हणाले. जर राज्यातील सरकार पडले तर आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार बनवणार आहोत, असेही आठवले यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!