Share

नव्या कृषी कायद्यांचा विरोध करण्यासाठी पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी तोडले जिओचे टॉवर

Published On: 

🕒 1 min read

चंदिगड: गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने लादलेले जाचक तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. देशभरातून शेतकऱ्यांना समर्थन वाढत आहे. अशात हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सांगणाऱ्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत दिल्लीच्या दिशेने जाणारे निवडक रस्ते अडवून बसलेल्या शेतकऱ्यांनी कायदा हाती घेतला. शेतकऱ्यांनी पंजाबमध्ये जिओच्या १४११ टॉवरची मोडतोड केली. यापैकी १७६ टॉवरची मोडतोड मागील २४ तासांमध्ये झाली.टाईम्स नाऊ मराठीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

प्रामुख्याने मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या मालमत्तांना शेतकऱ्यांनी लक्ष्य केले आहे. शेतकऱ्यांनी ‘जिओ’ची सेवा देणाऱ्या मोबाईल टॉवर प्रामुख्याने उद्ध्वस्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मोबाईल टॉवरला होणारा विद्युत पुरवठा खंडित करणे, टॉवर पाडण्याचा प्रयत्न करणे, टॉवरच्या देखभालीचे काम करणाऱ्यांना मारहाण करणे असे प्रकारही संतप्त शेतकऱ्यांनी केल्याची माहिती आहे.

कृषी कायद्यांमुळे मुकेश अंबानी आणि अदानी यांच्या कंपन्यांचा सर्वाधिक फायदा होणार असल्याची चर्चा पंजाबमध्ये सुरू झाली. यानंतर शेतकऱ्यांनी जिओच्या टॉवरची मोडतोड सुरू केली. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंह यांनी जिओच्या टॉवरची मोडतोड करू नका असे आवाहन केले आहे. मात्र या आवाहनाला आंदोलकांनी गांभीर्याने घेतले नसल्याची चर्चा आहे.

दरम्यान, एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला पंजाब सरकारने कारवाई करण्यावरून सोयीस्कर मौन बाळगले आहे. टॉवर मोडतोड प्रकरणी काय कारवाई करणार हे जाहीर केलेले नाही तसेच करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगाही उगारलेला नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!