मुंबई : शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावलं असून पीएमसी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना २९ डिसेंबरला चौकशीसाठी पाचारण करण्यात आले असल्याचं वृत्त माध्यमांनी दिले आहे.
एका बाजूला भाजपला सोडचिट्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना एका भूखंड खरेदी प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.तर दुसऱ्या बाजूला संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस पाठविल्याच्या बातम्यांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजपसह ईडीवर आगपाखड केली आहे. ‘मी माझ्या सगळ्या संपत्तीचा तपशील देऊ शकतो. माझ्याकडेही तुमच्या मुलाबाळांच्या संपत्तीचे हिशेब आहेत. मी तोंड उघडलं तर केंद्रातील सरकारला हादरा बसेल. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला कोणाच्याही मुलाबाळांपर्यंत जायचे नाही असे सांगितले आहे. बाळासाहेबांचीही तशीच शिकवण आहे, ‘ असं भाजपला ठणकावलं आहे.
‘एक काळ होता की ईडी, सीबीआय, सीआडी या विभागांना एक प्रतिष्ठा होती. मात्र आता केंद्रातलं सरकार ईडीचा वापर हे आमच्यावर सूड उगवण्यासाठी करत आहे असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. बायकांच्या पदराआड लपून खेळी करणं भाजपाने थांबवावं,’ असा इशारा देखील संजय राऊत यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘भारतात राहुल गांधी यांची सुटी संपली आहे आणि ते आज इटलीला परत गेलेत’
- ईडीच्या कार्यालयाबाहेर झळकतोय ‘भाजपा प्रदेश कार्यलया’चा बॅनर!
- महाविकास आघाडी कुणालाही घाबरत नाही; ईडीची कारवाई राजकीय हेतूने प्रेरित : आदित्य ठाकरे
- देशातील पहिल्या ‘चालकरहीत’ मेट्रोचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन
- काँग्रेसच्या आमदारांनी घेतली अमित शाह यांची भेट; दोन आमदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
