Share

ईडीच्या कार्यालयाबाहेर झळकतोय ‘भाजपा प्रदेश कार्यलया’चा बॅनर!

Published On: 

मुंबई : शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावलं असून पीएमसी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना २९ डिसेंबरला चौकशीसाठी पाचारण करण्यात आले असल्याचं वृत्त माध्यमांनी दिले आहे.

एका बाजूला भाजपला सोडचिट्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना एका भूखंड खरेदी प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.तर दुसऱ्या बाजूला संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस पाठविल्याच्या बातम्यांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजपसह ईडीवर आगपाखड केली आहे. ‘गेल्या काही वर्षभरात ईडी, सीबीआय या सरकारी संस्थांचा वापर हा राजकीय सूडबुद्धीने केला जात आहे. शरद पवार, प्रताप सरनाईक, प्रफुल्ल पटेल, एकनाथ खडसे यांच्यासारखे नेते भाजपविरोधात राज्यात आवाज उठवत आहेत. यामुळे भाजप वैफल्यग्रस्त झाली आहे. तसेच, भाजपला याची किंमत मोजावी लागेल असा इशारा देखील त्यांनी दिला.’

संजय राऊत यांची पत्रकार परिषद संपली असतानाच दुसरीकडे ईडीच्या कार्यालयाबाहेर झळकलेल्या बॅनरची चर्चा रंगू लागली आहे. ईडीच्या कार्यालयाबाहेर ‘भाजप प्रदेश कार्यलय’ असा फ्लेक्स लावण्यात आला आहे. हा बॅनर अजूनही तसाच आहे. दरम्यान संजय राऊत यांनी, ‘ माझ्या माहितीप्रमाणे बाहेरच्या व्यक्तीला ईडी कार्यालयात प्रवेश मिळत नाही. मात्र गेल्या ३ महिन्यांपासून भाजपचे लोक या कार्यालयात चकरा मारत आहेत’ असा गंभीर आरोप देखील केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!