🕒 1 min read
पुणे:- केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अजूनही सरकारला त्यात यश आलेलं नाही. सरकार तीन कृषी कायद्यांवर ठाम आहे तर शेतकरी देखील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
दिल्लीतील शेतकरी आंदोलन राजकीय आंदोलन आहे. हे आंदोलन मूठभर शेतकरी करत आहेत. जर हे शेतकरी विधेयक चुकीचे आहे असे जर शेतकऱ्यांना वाटले असते तर देशभर आंदोलन झाले असते. महाराष्ट्र काँग्रेसने अनेक शेतकऱ्यांना रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या कार्यकर्त्यांशिवाय कोणीच रस्त्यावर आले नाही. महाराष्ट्रात आंदोलन नाही मध्य प्रदेशमध्ये नाही, कर्नाटकमध्ये नाही देशात कुठंच आंदोलन नाही केवळ पंजाब मधील शेतकरी ह्या आंदोलनात सहभागी आहेत, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी केली आहे.
दरम्यान, नवीन कृषी कायद्यांच्या निषेधार्थ पंजाब, हरियाणा येथील शेतकरी गेल्या चार आठवड्यांपासून दिल्लीच्या सीमेवर निदर्शने करीत आहेत. चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, परंतु सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये एकमत झाले नाही. शेतकरी तिन्ही कायदे रद्द करण्यावर ठाम आहेत. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले की, आम्ही पंजाबच्या शेतकरी संघटनांसह देशातील अनेक शेतकरी संघटनांशी चर्चा करीत आहोत आणि लवकरच यावर तोडगा निघू शकेल.
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा द्या-चंद्रकांत पाटील
- वयाच्या २१ व्या वर्षी ‘ती’ झाली देशातील सर्वात तरुण महापौर !
- ‘मेरी ख्रिसमस फक्त अशा लोकांना जे हिंदू सणांमध्ये सिलेक्टिव्ह नाहीत’
- ‘सांस्कृतिक कार्य विभागाच्या घोषित पुरस्कारांची रक्कम लवकरच मानकऱ्यांच्या खात्यात जमा करू’
- न्याय, पैसा, हमीभाव आणि सुरक्षा देण्यात मोदी सरकार यशस्वी,प्रीतम मुंडेंचे सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
