🕒 1 min read
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने लादलेले जाचक तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. देशभरातून शेतकऱ्यांना समर्थन वाढत आहे. अशात हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सांगणाऱ्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. केंद्र सरकारच्या कृषी बिलांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर पंजाब व अन्य राज्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. महाराष्ट्रात देखील आता शेतकरी नेते आक्रमक होत असल्याचं दिसून येत आहे.
देशातील ज्या उद्योगपतींसाठी हे कायदे केले आहेत, निदान त्यांना तरी शेतकऱ्यांबद्दल दया यायला हवी होती, असे म्हणत अदानी आणि अंबानी यांच्या कार्यालयावर आज मोर्चा काढणारचं असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली होती. त्यानुसार या मोर्चाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, राज्यमंत्री बच्चू कडू यांना मुंबईत रिलायन्सच्या कार्यालयासमोर होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्यापासून रोखण्यात आलं. खुद्द राज्यमंत्र्यांनाच रोखण्यात आल्याने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
तब्बल चार तास त्यांना ताटकळत थांबावं लागल्यानंतर त्यांना मुंबईला येण्याची परवानगी देण्यात आली. या घडामोडींवर भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी मात्र टीका केली आहे. ‘राज्यातील एक मंत्री जिओ वर आंदोलन करायला निघतो आणि दुसरा मंत्री त्यांना अटकाव करतो, ही मिलिजुली कुस्ती आहे. आपल्या अपयशाकडून सामान्य जनतेचे लक्ष हटवण्यासाठी संजय राऊतांची वाचाळगीरी आणि बच्चू कडू यांची विरुगिरी हा उद्धव ठाकरे सरकारचा प्रायोजित कार्यक्रम !’ असं ट्विट करत हे सगळं नौटंकी असल्याचं सांगितलं आहे.
राज्यातील एक मंत्री जिओ वर आंदोलन करायला निघतो आणि दुसरा मंत्री त्यांना अटकाव करतो, ही मिलिजुली कुस्ती आहे. आपल्या अपयशाकडून सामान्य जनतेचे लक्ष हटवण्यासाठी संजय राऊतांची वाचाळगीरी आणि बच्चू कडू यांची विरुगिरी हा उद्धव ठाकरे सरकारचा प्रायोजित कार्यक्रम !#FarmersWithModi#नौटंकी
— Shivaray Kulkarni ( मोदी का परिवार ) (@ShivarayK) December 22, 2020
राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो तसं नरेंद्र मोदी सरकारचा जीव अंबानी आणि अदानीमध्ये – तुपकर
राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो तसं पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा जीव अंबानी आणि अदानीमध्ये आहे. देश बुडला तरी चालेल पण अंबानी आणि अदानी जिवंत राहिले पाहिजे ही केंद्र सरकारची भूमिका दुर्दैवी आहे. तसं आता अंबानी आणि अदानी यांनी धक्का दिल्याशिवाय नरेंद्र मोदी जागे होणार नाहीत म्हणून आजचा मोर्चा अत्यंत महत्वाचा असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ज्या गाण्यासाठी नेहाने प्रेग्नंसीच नाटक केलं अखेर ते गाणे प्रदर्शित
- ‘आर्थिक हितसंबंधांतून व मोदींच्या इच्छेखातर भाजपाने मुंबईकरांना वेठीस धरले’
- सुरेश रैना-गुरु रंधावा यांची अटकेनंतर सुटका
- अण्णांची भेट घेवून भाजपनेते म्हणाले,नव्या कृषी कायद्यांमुळे देशातील शेतकऱ्यांचे हित झाल्याचं दिसेल
- भाजपने प.बंगालमध्ये दोन अंकी जागा जिंकल्या तर मी ट्विटर वापरणं सोडून देईन : प्रशांत किशोर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

