Share

अण्णांची भेट घेवून भाजपनेते म्हणाले,नव्या कृषी कायद्यांमुळे देशातील शेतकऱ्यांचे हित झाल्याचं दिसेल

Published On: 

🕒 1 min read

राळेगणसिद्धी : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने लादलेले जाचक तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. देशभरातून शेतकऱ्यांना समर्थन वाढत आहे. तर दुसऱ्या बाजूला हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सांगणाऱ्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकरी प्रश्नावर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर काल भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार हरिभाऊ बागडे आणि राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड यांनी राळेगणसिद्धी इथे अण्णांची भेट घेऊन चर्चा केली.

अण्णांनी उपोषणाचा निर्णय घेऊ नये अशी विनंती त्यांनी यावेळी केली. हजारे यांनी गेल्या आठवड्यात केंद्रीय कृषी मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसंबंधी पत्र लिहून आंदोलनाचा इशारा दिला होता. सरकारनं 2018 साली आपल्याला दिलेल्या लेखी आश्वासनानुसार केंद्रीय कृषी मूल्य आयोगाला संपूर्ण स्वायत्तता आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतीमालाला हमीभाव यासंबंधी निर्णय घेऊन अंमलबजावणी केली तर शेतकऱ्यांना आंदोलन करावंच लागणार नाही, असंही अण्णांचं म्हणणं आहे.

दरम्यान, काल भाजपा नेत्यांनी अण्णांना सुधारित कृषी कायद्याची मराठी आवृत्ती दिली आणि हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असून लवकरच देशातील शेतकऱ्यांचे हित झाल्याचं दिसेल असं सांगीतलं.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या या आंदोलनात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सहभागी व्हावं, अशी मागणी आता करण्यात येत आहे. त्यासाठी दिल्लीतील 6 शेतकऱ्यांचं एक शिष्टमंडळ अण्णांच्या भेटीसाठी काल राळेगणसिद्धीत दाखल झाले होते. ह्या शिष्टमंडळाने अण्णा हजारे यांच्यासोबत चर्चा करुन त्यांना आंदोलनात सहभागी होण्याची विनंती केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!