मुंबई : नेहा कक्कर लवकरच आई होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. नेहा कक्करच्या प्रेग्नंसीवर अनेक चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. नेहा आणि रोहनप्रीत दोन महिन्यांपूर्वीच 24 ऑक्टोबर रोजी लग्नबंधनात अडकले. त्यामुळे केवळ चाहतेच नाही, तर अनेक युजर्सही कॉमेंट करून नेहाच्या प्रेग्नंसीवर आश्चर्य व्यक्त करत होते. नेहाच्या या फोटोमागचा खरा अर्थ आता समोर आला.
बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर एका फोटोमुळे चर्चेत आली होती. या फोटोमध्ये नेहा तिचा नवरा रोहनप्रीतसोबत दिसली होती. त्या फोटोत दिसणाऱ्या बेबी बम्पमुळे तिच्या गरोदरपणाची चर्चा सुरू होती. पण ती प्रेग्नंट नसून तिच्या नव्या गाण्याच्या प्रमोशनसाठी तिने हा फंडा वापरला असल्याचं नंतर दिसून आलं.
त्यावरुन काही जणांनी तिला ट्रोलही केलं होतं. ज्या मुझिक व्हिडीओसाठी नेहाने एवढा खटाटोप केला होता तो व्हिडीओ प्रदर्शित झाला आहे. ‘खयाल रखा कर’ या नव्या गाण्यामध्ये ती रोहनप्रीतसोबत दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- मालमत्ता खरेदीदारांना खुशखबर ! मुद्रांक शुल्कामधील सवलत चार महिन्यांनी वाढली…
- मतदारसंघातील बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींना 25 लाखांचा निधी देणार- देवेंद्र भुयार
- भारताला आत्मविश्वास हवा तरच भारतीय संघाला कसोटी मालिकेत व्हाईटवॉश मिळू शकतो
- अण्णांची भेट घेवून भाजपनेते म्हणाले,नव्या कृषी कायद्यांमुळे देशातील शेतकऱ्यांचे हित झाल्याचं दिसेल
- भाजपने प.बंगालमध्ये दोन अंकी जागा जिंकल्या तर मी ट्विटर वापरणं सोडून देईन : प्रशांत किशोर


