Share

मशाल सोहळ्याने प्रतापगड लख्ख; प्रतापगडावर शिवप्रतापाचा दिनाचा उत्सव साजरा !

Published On: 

🕒 1 min read

सातारा: स्वराज्य निर्मितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत रोमांचक पणे यशस्वी केलेल्या लढायांपैकी प्रतापगडाची लढाई ही एक महत्त्वाची लढाई आहे. शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या रूपानेआलेले स्वराज्यावरील संकट अफजलखानाचा वध करून तसेच त्याच्या सैन्याचा दणदणीत पराभव करून परतवून लावले. महाराजांच्या या विजयानिमित्त दरवर्षी शिव पराक्रमाचा सोहळा साजरा केल जातो मात्र यंद कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे कार्यक्रम अत्यंत कमी लोकांमध्ये साजरे करण्यत आले

महाराजांनी पुण्याजवळील मावळ प्रातांत नियंत्रण मिळवले होते. त्या वेळेस हा भाग अदिलशाहीच्या अखत्यारीत येत होता. त्यामुळे महाराजांची विजयी घोडदौड आदिलशाहीला आव्हान निर्माण करत होती. या पार्श्वभूमीवर विजापूरच्या दरबारात महाराजांचा बंदोबस्त करण्याची मोहिम अफजलखानाकडे देण्यात आली. अफजलखानाने यापूर्वी महाराजांचे थोरले बंधूसंभाजी यांची हत्या केली होती. तसेच आदिलशाही दरबारात त्याचे व वडील शहाजी महाराजांचे देखील वैर होते.

भेटीच्या दिवशी अफजलखान भेटीच्या वेळेआधीच शामियान्यात आला. तर कपटी खान मात्र निःशस्त्र भेटायचे असतांना देखील आलिंगन देताना महाराजांवर वर केला आणि लपवलेली वाघनखे काढली व खानाच्या पोटात घुसवून त्याची आतडी बाहेर काढली. अनपेक्षित प्रतिवाराने भेदरलेल्या खानाने दगा दगा असा आक्रोश केला. महाराजांनी भेटीची योजना आखतानाच खानाचा दगा देण्याचा अंदाज बांधूनच महाराजांनी अवाढव्य खानावर अभूतपूर्व असा विजय मिळवला.

ATTACHMENT DETAILS

या पार्श्वभूमीवर आज महाराजांच्या प्रतापगडावरील महाराजांनि केलेल्या अफजल खान वधाला आज ३५० वर्ष पूर्ण झाली. नवरात्रोत्सव दरम्यान भव्य माशाल सोहळा पार पडला. तर गडावर अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीत देवीचा अभिषेक आणि पूजा पार पडली तर यावेळी भव्य अशा प्रतापगडाला आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. यावेळी गडांच्या सर्व तटांवर मशाल पेटवून गडाला रोशन करत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवीकडे साकडे देखील घालण्यात आले. यावेळी महाजांच्या विजयाची साक्ष देणारा प्रतापगडावर अत्यंत रामान्च्क दृश्य दिसत होते. मात्र यावेळी शिवप्रेमींना गडावर येण्यास मनाई असल्याने शिव प्रेमींमध्ये नाराजी दिसून आली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Festival India Maharashtra Satara

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या