🕒 1 min read
हैदराबाद : हैदराबाद पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम आतापासूनच सुरू झाली आहे. आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस असा थेट सामना होणार आहे. मात्र असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएम हा देखील महत्वाचा पक्ष ठरेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक एआयएमआयएम पक्षाने निवडणूक लढवण्याची घोषणे नंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि ओवैसी यांच्यात चांगलेच शाब्दिक द्वंद्व पाहायला मिळत आहे. ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर ओवेसी यांनी दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेत आहे.
ममता म्हणाल्या होत्या की ‘भाजप मुस्लिम मत तोडण्यासाठी हैदराबाद से एका पक्षावर करोडों रुपये खर्च करत आहे’. यावर ओवैसी यांनी बोलले की, असा कोणी जन्माला नाही आला आहे जो ओवैसी ला खरेदी करु शकेल, मुस्लिम मतदान ममता बॅनर्जीची जहागिर नाही आहे.
Never was a man born who can buy Asaduddin Owaisi with money. Her allegation is baseless and she is restless. She should worry about her own home, so many of her people are going to BJP. She has insulted the voters of Bihar and the people who voted for us: Asaduddin Owaisi, AIMIM https://t.co/mT1fe7piii pic.twitter.com/8rfWq5eSk3
— ANI (@ANI) December 16, 2020
ममता बॅनर्जीवर हल्लाबोल करत ओवैसी पुढे म्हणाले की, ‘त्याचे आरोप आधार हीन आहेत त्या अस्वस्थ आहेत, त्यांनी त्यांच्या घराची चिंता केली पाहिजे. त्याच्या स्व:ताच्या पक्षाचे किती लोक बीजेपी जात आहे. बॅनर्जी यांनी बिहारच्या त्या मतदारांचा अपमान केला आहे ज्यांनी आम्हाला मतदान केले होते’.
महत्वाच्या बातम्या
- विद्यार्थ्यांसाठी खुशखबर : एक-दोन नव्हे तब्बल चार वेळा होणार JEE Main परीक्षा
- ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार साडेतीन हजार कोटी रुपयांचं अर्थसहाय्य
- अतिवृष्टीच्या संकटातून सावरण्यासाठी राज्यात शेतकऱ्यांना दिवसा विज पुरवठा करा : भाजपा
- पहिल्या टेस्ट मॅचमध्ये पृथ्वी शॉ पुन्हा अपयशी, एकही रन न घेता माघारी
- अन्वय नाईक प्रकरण : आरोपपत्राला आव्हान देण्यास अर्णब गोस्वामींना हायकोर्टाची परवानगी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

