🕒 1 min read
मुंबई : रस्त्यावर वाहन चालवणाऱ्यांमध्ये बेशिस्तपणा असल्याने याच कारणामुळे अपघात झालेचे दिसून येते. यामध्ये हेल्मेट न वापरणे, वाहनांना विशेषतः दुचाकींना आरसे नसल्याने मागील वाहने न दिसल्याने अनेकांचे अपघात होतात. यासाठी परिवहन विभागातर्फे मोहीम हाती घेण्यात आली आहे.
नव्या वर्षात टोलनाक्यापासून गाड्यांपर्यंतचे नियम बदलू लागले आहेत. टोलनाक्यावर फास्टॅग अनिवार्य करण्यात आलाय. दुसरीकडे विनाआरसा गाडी चालवणाऱ्यांना आता आरटीओची नजर असणार आहे. वाहन चालवताना लायसन्स, कागदपत्रे, विमा पॉलिसी, पीयूसी प्रमाणपत्र, वाहनांच्या दोन्ही बाजूचे आरसे बंधनकारक आहेत. विनाआरसा वाहन चालविणाऱ्यांना पाचशे रुपये दंड आकारला जाणारेय.
तरुण मुलांमध्ये विनाआरसा गाडी चालवण्याचे प्रमाण जास्त असते. तर याच तरुणाच्या गाड्यांना आरसे नसल्याचे देखील आढळून येते. गाडीला आरसा नसल्यास चालकास मागच्या गाड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात होण्याच्या घटना घडतात. यावर आळा घालण्यासाठी वाहनांचा नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यास सुरुवात झाल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी सांगितले.
परिवहन विभागातर्फे विनावाहन परवाना, विना कागदपत्रे, विमा पॉलिसी असणाऱ्यांवरील कारवाई होणार आहे. तसेच फॅन्सी नंबर प्लेट न वापरण्याचे आवाहन देखील परिवहन विभागातर्फे वारंवार करण्यात येते. मोबाईलवर बोलत वाहन चालविण्यांनाही भुर्दंड पडतो. आता विभागाने आरसे नसणाऱ्या वाहनांवर कारवाईची मोहीम हाती घेतलीय.
महत्वाच्या बातम्या
- कोर्टाचा अवमान करणाऱ्या संजय राऊतांवर कायदेशीर कारवाई करा; भाजपची मागणी
- आपल्या हक्कांसाठी शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा हक्क नक्की आहे, मात्र रस्ते अडवणे गैर : कोर्ट
- सोन्यासह रोखरक्कम लंपास करत मुथूट फिनकॉर्पला दिवसाढवळ्या लुटलं…
- #Happy Birthday : यूथ आयकॉन जॉन अब्राहमचा आज ४८वा जन्मदिवस
- हा न्यायालयाचा अपमान!, भाजप आमदाराने केली राऊतांविरोधात कारवाईची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

