🕒 1 min read
मुंबई : अब्जाधीश मुकेश अंबानी यांनी मंगळवारी 2021 च्या उत्तरार्धात 5 जी टेलिकॉम सेवा सुरू करण्याचे संकेत दिले आहे. आणि सांगितले की सर्वत्र स्वस्त आणि उपलब्ध असलेल्या अल्ट्रा-हाय-स्पीड 5 जी सेवा लवकरात लवकर आणण्यासाठी धोरणात्मक पावले उचलणे आवश्यक आहे. अंबानी ज्यांचे चार वर्षांचे टेलिकॉम उपक्रम जिओने प्रथम क्रमांकावर कब्जा केला आहे. आणि स्वस्त दरामध्ये मोफत व्हॉईस कॉलिंग आणि डेटा उपलब्ध करुन दिला आहे.
दरम्यान, देशातील खासगी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने नोव्हेंबर महिन्यात ४ जी डाउनलोड स्पीडमध्ये पुन्हा एकदा बाजी मारली आहे. कंपनीने डाउलोड स्पीडमध्ये वोडाफोन-आयडियारिलायन्स जिओने पुन्हा एकदा ४ जी डाउनलोड स्पीडमध्ये बाजी मारली आहे.
टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) च्या नोव्हेंबर महिन्यातील आकडेवारी समोर आली आहे. यात जिओची डाउनलोड स्पीड सरासरी २०.८ एमबीपीएस नोंदली गेली आहे. ही स्पीड ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत ३.० एमबीपीएस जास्त आहे. ऑक्टोबर महिन्यात जिओची ५ जी स्पीड १७.८ एमबीपीएस होती.
एअरटेलची साधारण सरासरी ४ जी डाउनलोड स्पीड ऑक्टोबरच्या ७.५ एमबीपीएसच्या तुलनेत नोव्हेंबर मध्ये ८ एमबीपीएस राहिली आहे. आता वोडाफोन आणि आयडिया सेल्यूलर ने एकत्रित काम केले असले तरी ट्राय मात्र या दोन्ही कंपन्यांचे आकडे वेगवेगळे दाखवले आहे.वोडाफोन आयडिया नेटवर्कच्या ४ जी डाउनलोड स्पीड मध्ये गेल्या महिन्याच्या तुलनेत थोड अंतर पाहायला मिळाले आहे. वोडाफोनची स्पीड सुधारली गेली आहे.
अशातच भारतीय बाजारपेठेत 5G च्या स्मार्टफोननी रुंजी घालायला सुरुवात केली आहे. २० ते ३० हजारांत वनप्लस, मोटरोला, व्हिवोचे स्मार्टफोन लाँच झाले आहेत. कोणाचा स्मार्टफोन किती स्वस्त, त्यामध्ये प्रोसेसर कोणता आदी चर्चा होत असतानाच देशात 5G नेटवर्क कधी सुरु होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. यावर रिलायन्स जिओचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी मोठी घोषणा केली होती. त्यामुळे आता भारतात 5G नेमक येणार कधी याची वाट बघणेच ग्राहकांच्या हातात आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोर्टाचा अवमान करणाऱ्या संजय राऊतांवर कायदेशीर कारवाई करा; भाजपची मागणी
- आपल्या हक्कांसाठी शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा हक्क नक्की आहे, मात्र रस्ते अडवणे गैर : कोर्ट
- सोन्यासह रोखरक्कम लंपास करत मुथूट फिनकॉर्पला दिवसाढवळ्या लुटलं…
- #Happy Birthday : यूथ आयकॉन जॉन अब्राहमचा आज ४८वा जन्मदिवस
- हा न्यायालयाचा अपमान!, भाजप आमदाराने केली राऊतांविरोधात कारवाईची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

