🕒 1 min read
पुणे : ज्या विद्यार्थ्यांनी २०१९ मध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्याचं यश प्राप्त केलं त्यांना देखील शासनाच्या अनास्थेला बळी पडावं लागत आहे. ज्या जागांची जाहिरात आरक्षणाच्या वादापूर्वीच निघाल्या होत्या, त्यांची भरती रखडली आहे.
सुमारे दीड वर्षांहून अधिक काळ लोटला तरी मैदानी चाचण्या खोळंबल्या आहेत. कोरोना काळातही जिद्दीने शारीरिक व्यायाम करणं, योग्य आहार करणं, दैनंदिनी पाळणं, मानसिक तयारी करणं तसेच सर्व कष्ट घेऊनही अजूनही रोजगाराबद्दल अनिश्चिततेचं असलेलं ओझं सांभाळून हे विद्यार्थी राज्यसेवा आयोगाच्या पुढील सूचनेकडे लक्ष लावून आहेत.
पोलीस उपनिरीक्षक २०१९ मुख्य परीक्षा २८ जुलै २०१९ व ४ ऑगस्ट २०१९ रोजी झाली असून त्याला तब्बल १६ महिने होऊन गेले असून या परीक्षांचा निकाल २०२० रोजी लागला होता. यानंतर २ ते ३ महिन्यांत मैदानी चाचण्या व मुलाखत होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोना महामारीमुळे या भरत्या रखडल्या असून आता कोरोना प्रभाव कमी झाला आहे. तसेच इतर दैनंदिन कामकाज देखील सुरळीत झाले असून आता या रखडलेल्या मैदानी चाचण्या घेण्यात याव्यात अशी मागणी या भावी अधिकाऱ्यांनी केली आहे.
सद्या या तरुण-तरुणींना आर्थिक, मानसिक तणावाला सामोरं जावं लागत असून मैदानी चाचण्यांच्या तयारीसाठी दर महिना सुमारे १० ते १२ हजार रुपये खर्च देखील येत आहेत. पोलीस उपनिरीक्षक २०१७ च्या अमरावती विभागाच्या मैदानी चाचण्या कोरोनाचे नियम पळून खात्याअंतगर्त घेण्यात आल्या असून आता २०१९ च्या रखडलेल्या चाचण्या देखील लवकरात लवकर घेण्यात याव्यात अशी मागणी करण्यात येत असून यासंदर्भात प्रदीप पिसाळ, सुरज कावळे, अजित देशमुख, शंकर पाटील, विवेक कांदे आदी विद्यार्थ्यांनी ‘महाराष्ट्र देशा’ला माहिती दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोर्टाचा अवमान करणाऱ्या संजय राऊतांवर कायदेशीर कारवाई करा; भाजपची मागणी
- आपल्या हक्कांसाठी शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा हक्क नक्की आहे, मात्र रस्ते अडवणे गैर : कोर्ट
- सोन्यासह रोखरक्कम लंपास करत मुथूट फिनकॉर्पला दिवसाढवळ्या लुटलं…
- #Happy Birthday : यूथ आयकॉन जॉन अब्राहमचा आज ४८वा जन्मदिवस
- हा न्यायालयाचा अपमान!, भाजप आमदाराने केली राऊतांविरोधात कारवाईची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

