Share

सोन्यासह रोखरक्कम लंपास करत मुथूट फिनकॉर्पला दिवसाढवळ्या लुटलं…

Published On: 

🕒 1 min read

वर्धा: दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये सामन्यांच्या घरात नाही तर बँकांवरील दरोडे द्खील वाढले आहेत. यावेळी अशीच एक घटना समोर आली ती म्हणजे वर्धा शहरातील मुथूट फिनकॉर्पच्या कार्यालयावर दिवसाढवळ्या दरोडा टाकला आहे.

वर्धा शहरातील मुथूट फिनकॉर्पच्या कार्यालयावर दिवसाढवळ्या दरोडा टाकण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. या मध्ये दरोडेखोरांनी साडेतीन किलो सोने लुटलं असून फरार झाले आहेत.

बंदूक आणि चाकूचा धाक दाखवत दरोडेखोर कार्यालयात घुसले. सोने तारण कर्ज देणाऱ्या या कंपनीच्या कार्यालयातून घुसत त्यांनी व्यवस्थापकीय अधिकाऱ्याच्या कक्षातील चेंबरपेटी पळवली. त्यात ३ लाख १८ हजार रूपयाची रोख रक्कम व साडेतीन किलो सोने असल्याचं सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी याप्रकरणी चौकशी सुरु केली असून कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान हा सर्व प्रकार कार्यालयातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्यामुळे आता हे दरोडेखोर कधी पकडले जाणार या कडे लक्ष लागले आहे. तर कर्मचारी वर्ग या दरोड्या नंतर धास्तावला आहे.

दरोडा पडत असताना सुरक्षारक्षकाव्यतीरिक्त कोणीही उपस्थित नव्हतं. दरोडा घातल्यानंतर दरोडेखोर लगेच पसार झाले. जाताना त्यांनी एका कर्मचाऱ्याची दुचाकीही चोरून नेली. दिवसाढवळ्या हा असा पहिलाच दरोडा शहरात पडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात चौकशी सुरू केली असून कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले जात आहेत.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!