Share

#Happy Birthday : यूथ आयकॉन जॉन अब्राहमचा आज ४८वा जन्मदिवस

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलीवूडमध्ये अनेक हिरो आहेत. पण काही स्वत: ला सिद्ध करून एक वेगळं स्थान निर्माण करतात आणि विशेषत्वाने लक्षात राहतात. असंच एक नाव आहे ते नाव म्हणजे जॉन अब्राहम. जॉनने करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. त्याने दिग्दर्शक महेश भट यांच्या ‘जिस्म’ चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. बॉलीवूडमधला सर्वांत फिट आणि स्मार्ट अभिनेत्यांपैकी एक असलेल्या जॉन अब्राहम आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘जिस्म’ चित्रपटानंतर जॉन एका ज्योतिषाला भेटला होता. त्या ज्योतिषाने जॉनला फिल्म इंडस्ट्रीमध्ये भविष्यच नसल्याचं सांगितलं. पण जॉननी ते भविष्य खोटं करून दाखवलं. तो आता केवळ अभिनेता नाही, तर यशस्वी निर्माताही झाला आहे. जॉन अब्राहमच्या सुरुवातीच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही.

जिस्म, पाप, लकीर, साया हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. 2004 मध्ये आलेल्या ‘धूम’ चित्रपटाने जॉनला खरी ओळख आणि यशही मिळवून दिलं. या चित्रपटातल्या त्याच्या खलनायकी भूमिकेला लोकांनी डोक्यावर घेतलं. लांब केस, सिक्स पॅक अब्ज आणि सुपर बाईकसोबत जॉन, भारतीय तरुणांसाठी यूथ आयकॉनच झाला होता. आगामी वर्षात जॉनचे ‘सत्यमेव जयते-2’ आणि ‘मुंबई सागा’ हे चित्रपट रिलीज होण्याची शक्यता आहे. या दोन्ही चित्रपटाच्या चित्रीकरणाला  सुरुवात झाली आहे.

 

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!