🕒 1 min read
नगर : शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना आता भारतीय संस्कृतीप्रमाणे पोषाख परिधान करावा लागणार आहे. अर्थात, याची सक्ती करण्यात आली नसून साईबाबा संस्थांनने भाविकांना अशी विनंतीवजा सूचना केली आहे.
संस्थानाच्या निर्णयानंतर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी जोरदार टीका केली होती. ‘पुजारीही अर्धनग्न अवस्थेत असतात मग त्यांनाही मंदिरात प्रवेश नाकारणार का?’ असा सवाल करत त्यांनी शिर्डी संस्थानने घेतलेला निर्णय तातडीने मागे घेऊन जो बोर्ड लावला आहे तो त्वरित काढून टाकावा अन्यथा शिर्डी मध्ये येऊन आम्ही तो बोर्ड स्वतः काढू, असा इशारा त्यांनी दिला होता.
यानंतर, मोठं वादंग निर्माण झालं होतं. शिवसेनेसह भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने देखील साई संस्थानच्या निर्णयाला समर्थन दिलं होतं. तर, शिर्डीत येऊन काही स्टंटबाजी केली, तर त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा व ‘शिवसेना स्टाइल’ने उत्तर देण्याचा इशारा शिवसेना महिला आघाडीने दिला होता.
त्यामुळेच संभाव्य वादाची परिस्थिती बघता व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तृप्ती देसाईंना शिर्डी हद्दीत प्रवेश करण्यास 8 डिसेंबर ते 11 डिसेंबर बंदी घालण्यात आली आहे. विभागीय दंडाधिकारी गोविंद शिंदे शिर्डी विभाग यांनी संबंधित आदेश दिले असून शिर्डी पोलीसांनी तृप्ती देसाईंना आदेशाची नोटीस देखील दिली आहे. याबाबत स्वतः तृप्ती देसाई यांनी ‘महाराष्ट्र देशा’ला माहिती दिली होती.
आता, ही बंदी घातल्यानंतरही तृप्ती देसाई मात्र आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. ‘ नोटीस बजावून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, आमचा आवाज कोणीही दाबू शकणार नाही. आम्हाला लोकशाहीने आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. ज्यांनी चुकीचा बोर्ड लावला आहे, जे भक्तांचं व्यक्तिस्वातंत्र्य हिरावून घेत आहेत त्यांच्यावर मात्र कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात नाही. त्यामुळे एकतर्फी कारवाई करून आमचा आवाज दाबत येणार नाही असं म्हणत त्यांनी उद्या शिर्डीमध्ये जाऊन तो फलक हटवण्यावर ठाम असल्याचं सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- देशातील असंतोष विझविण्याऐवजी तो भडकलेला ठेवण्यात सरकारला रस आहे : शिवसेना
- मराठा आरक्षणावरील स्थगिती कायम; आता एमपीएससी परीक्षा, मेगा भरतीचं काय?
- ‘शेतकऱ्यांच्या पैशावर मजा मारणारी ही बांडगुळं नष्ट व्हावीत म्हणूनच मोदींच कृषी विधेयक’
- काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून राज्य सरकार पडणार; केंद्रीय मंत्र्याचा दावा
- कधी-कधी मला असं वाटतं की मी मुख्यमंत्रीपदाच्या खूर्चीवर बसू नये- ममता बॅनर्जी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

