🕒 1 min read
सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्ध 20 षटकांच्या तीन सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज सीडनीत होणार आहे. दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी या सामन्याला सुरुवात होईल.
कॅनबेरामध्ये शुक्रवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं अस्ट्रेलियाला 11 धावांनी पराभूत करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात रवींद्र जडेजाला शेवटच्या षटकात चेंडू लागल्याने तो उर्वरित 2 सामने खेळू शकणार नाही; त्याच्याऐवजी वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर खेळणार आहे.
या टी20 पूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिचेल स्टार्कने उर्वरित टी 20 मालिकेमधून माघार घेतली आहे. स्टार्कने तशी सूचना ऑस्ट्रेलियाच्या टीम मॅनेजमेंटला दिली आहे.
स्टार्कच्या कुटुंबातील एक सदस्य आजारी पडल्याने त्याने माघार घेतली असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले. कुटुंबापेक्षा कोणतीही गोष्ट जगात मोठी नाही. मिचेल स्टार्कच्या निर्णयाचा आम्ही पूर्ण आदर करतो. तो त्याला वाटेल तेंव्हा टीममध्ये परत येऊ शकतो”, असे ऑस्ट्रेलियाचा कोच जस्टीन लॅँगरने सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- आता डिसले गुरुजीं आमदार होणार? दरेकर करणार शिफारस
- संजीवन समाधी सोहळ्याची गर्दी टाळण्यासाठी आजपासून आळंदीत संचारबंदी
- इंदूमिल येथील डॉ. बाबासाहेबांचे स्मारकाचे काम कधी पूर्ण होणार? धनंजय मुंडे म्हणाले…
- 1 जानेवारी पासून UPI पेमेंटवर शुल्क आकारणी
- भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा याचा 32 वा वाढदिवस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
