🕒 1 min read
जयपूर:- राजस्थानमध्ये मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी पुन्हा राजकीय खळबळ उडाली आहे. सरकार पाडण्याचा खेळ पुन्हा सुरू होणार असल्याचा आरोप कॉंग्रेस नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केला आहे. भाजप सरकार पाडण्याचा कट रचत आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधान यांनी काँग्रेसच्या बंडखोर आमदारांची भेट घेऊन त्यांना राजस्थानमधील काँग्रेस सरकार पाडण्यास सांगितलं आहे. महाराष्ट्रातही सरकार पाडण्याची चर्चा आहे, असे कॉंग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करतांना अशोक गहलोत म्हणाले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसच्या आमदारांची भेट घेतली आहे. काँग्रेसची पाच सरकारं पाडली आहेत. आता सहावं सरकार पडणार आहे, असं चहा-नाश्ता करत असताना अमित शहा आमदारांना म्हणाले, असा आरोप गहलोत यांनी केला आहे. तसंच धर्मेंद्र प्रधान हे त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी न्यायाधीशांशी चर्चा करण्यासंदर्भात बोलले. अमित शहा यांनी आमच्या आमदारांसोबत एक तास बैठक घेतली होती आणि पाच सरकारं पाडल्यानंतर सहावं देखील पाडण्यात येईल असं ते आमदारांना म्हणाले, असा दावा गहलोत यांनी केला आहे.
दरम्यान, याआधी देखील अशोक गहलोत यांनी भाजपवर राजस्थान सरकार पाडण्याचे प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला होता. राजस्थानमधील सरकार पाडण्यासाठी सुरु असलेल्या घोडेबाजारात भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान यांच्यासह अनेक मंत्र्यांचा सहभाग असल्याचा खळबळजनक आरोप मुख्यमंत्री गहलोत यांनी केला होता.
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित आमदाराचा थेट विरोधी पक्षनेत्यासोबत प्रवास; राजकीय चर्चांना उधाण
- संजीवन समाधी सोहळ्याची गर्दी टाळण्यासाठी आजपासून आळंदीत संचारबंदी
- महापरिनिर्वाण दिन : मुख्यमंत्री, राज्यपालांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
- शरद पवारांसह राष्ट्रवादीचे नेते संजय राऊतांच्या भेटीला; प्रकृतीची केली विचारपूस
- महाविकास आघाडी रंजल्या गांजलेल्यांच्या उन्नतीसाठी काम राहणार : जयंत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
