🕒 1 min read
मुंबई:- संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाल्यावर काल (५ डिसेंबर) संजय राऊत यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शरद पवारांनी ही भेट घेतल्याचे सांगितले आहे. यावेळी शरद पवारांसोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री धनंजय मुंडे यांसह दिग्गज नेते उपस्थित होते.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात संजय राऊत यांच्यावर हृदयात दोन स्टेन घालण्यात आल्या होत्या. त्यानंतर आणखी स्टेन टाकावे लागणार होते. त्यासाठी एप्रिल २०२० ही नियोजित वेळ होती. पण कोव्हिड प्रादुर्भावामुळे ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. अखेर संजय राऊत यांच्यावर बुधवारी लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया पूर्ण झाली. यावेळी दोन स्टेन त्यांच्या हृदयात टाकण्यात आले असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.
या भेटीवेळी शरद पवारांसोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री धनंजय मुंडे यांसह दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते. संजय राऊतांवर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाल्यामुळे राष्ट्रवादीच्या दिग्ग्ज नेत्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी अनेक राजकीय विषयांवरही चर्चा करण्यात आल्याचे बोललं जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- आता डिसले गुरुजीं आमदार होणार? दरेकर करणार शिफारस
- राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित आमदाराचा थेट विरोधी पक्षनेत्यासोबत प्रवास; राजकीय चर्चांना उधाण
- ‘स्वातंत्र्याची व्याख्या आज सोयीनुसार बदलली जाते’, राऊतांचा भाजपवर घणाघात
- जेष्ठ कलावंत रवी पटवर्धन यांचं निधन
- भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा याचा 32 वा वाढदिवस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
