Share

‘सध्या भारतीय संघाला नेतृत्वबदलाची गरज नाही’ विराट-रोहित चर्चेवर लक्ष्मणची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : हिटमॅन रोहितने आयपीएलच्या 13 व्या मोसमात मुंबई इंडियन्सलाआपल्या नेतृत्वात विजेतेपद मिळवून दिलं. रोहितच्या नेतृत्वात मुंबईला विजेतेपद मिळवून देण्याची ही पाचवी वेळ ठरली. तर दुसऱ्या बाजूला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचाकर्णधार विराट कोहलीला  13 मोसमांमधून एकदाही आपल्या नेतृत्वात विजेतेपद मिळवून देता आलं नाही.

तेव्हापासून रोहित शर्माला टीम इंडियाच्या टी 20 चे नेतृत्व देण्यात यावे, अशी मागणी सर्वत्र क्रिकेट वर्तुळात करण्यात येत आहे. दरम्यान  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विकेटकीपर फलंदाज पार्थिव पटेलने  याबाबत वक्तव्य केलं आहे. यावरच पार्थिव म्हणाला,  “कर्णधारपदाबाबत रोहित विराटच्या तुलनेत जास्त समजदार आहे. दबावात्मक परिस्थितीत कसा खेळ करायचा, निर्णायक क्षणी योग्य निर्णय घेण्याच्या बाबतीत रोहित विराटपेक्षा वरचढ आहे, अशी प्रतिक्रिया पार्थिवने दिली होती.

आयपीएलच्या तेराव्या हंगामात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने बाजी मारल्यानंतर सोशल मीडियावर भारतीय संघाला नेतृत्वबदलाची गरज असल्याची चर्चा सुरु झाली. त्यातच ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन-डे मालिका गमावल्यानंतर या चर्चेने आणखी जोर धरला. अनेक माजी खेळाडूंनीही विराटने भारताच्या वन-डे आणि टी-२० संघाचं कर्णधारपद रोहितकडे सोपवावं अशी मागणी केली आहे. परंतू माजी कसोटीपटू व्ही.व्ही.एस.लक्ष्मणच्या मते सध्या भारतीय संघाला नेतृत्वबदलाची गरज नाहीये.

“रोहित शर्मा एक उत्तम कर्णधार आहे यात काही वादच नाही. विराटच्या अनुपस्थितीत त्याने ज्या-ज्या वेळी भारतीय संघाचं नेतृत्व केलंय तेव्हा तो यशस्वी झालाय. एखाद्या संघाला पाच विजेतेपद मिळवून देणं ही सोपी गोष्ट नाहीये. त्याने मुंबईच्या संघाचं खूप चांगल्या पद्धतीने नेतृत्व केलं आहे. पण दुसऱ्या बाजूला विराट कोहलीही चांगली कामगिरी करतो आहे, त्यामुळे सध्या भारतीय संघाला नेतृत्वबदलाची गरज आहे असं मला वाटत नाही.” रोहित शर्माच्या कारकिर्दीवर लिहीण्यात आलेल्या पुस्तकाच्या व्हर्च्युअल प्रकाशन सोहळ्यादरम्यान लक्ष्मण बोलत होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!