Share

‘औरंगाबाद महापालिका निवडणूक स्वतंत्र लढविणार’ खा. जलील यांचा दावा…

Published On: 

औरंगाबाद :कोरोना च्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. आता मात्र अनलॉक प्रक्रियेदरम्यान जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आल्याने नियमांचे पालन करत या निवडणुका पार पाडतील.  पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर औरंगाबाद महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. यावेळी महापालिकेत निवडणूकपूर्व कोणतीही युती किंवा आघाडी करणार नाही. मात्र, निवडणुकीनंतर अशी आघाडी करण्यास एमआयएमची कोणतीही हरकत नसेल, असे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.

त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीबरोबर निवडणूकपूर्व हातमिळवणी होण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. अलिकडेच प्रकाश आंबेडकर यांनीही निवडणुकांमध्ये एमआयएमबरोबर आघाडी करणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते.औरंगाबाद महापालिका निवडणुकीमध्ये किती जागांवर उमेदवार उतरवायचे याचा निर्णय पक्षाचे प्रमुख असदोद्दीन ओवैसी घेतील. अद्यााप त्याबाबतचे निर्णय झालेले नाही. मात्र, आता महापालिकेच्या निवडणुकीतही भाजपकडून राष्ट्रीय मुद्दे चर्चेत आणले जात आहेत. हैदराबादच्या महापालिकेच्या निवडणुकीत हे प्रकर्षांने पाहावयास मिळाले, असे सांगत भाजपाने तिथे केलेला प्रचार खालच्या पातळीचा होता. अगदी ओवैसी यांना बॅ. जिनांची उपमाही दिली. असे करणे चुकीचे होते, असे खासदार जलील म्हणाले.

महापालिकेच्या निवडणुकीत यश मिळविल्यानंतर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही एमआयएमला यश मिळाले. त्यामुळे येणारी महापालिकेची निवडणूक अधिक जिद्दीने आणि प्रतिष्ठेची करून लढविली जाण्याचे संकेत खासदार जलील यांनी दिले. ‘वंचित बहुजन आघाडीमुळेच लोकसभेतले यश मिळाले, याबाबत कोणतेही दुमत नाही. नंतर जागावाटपाबाबत छोटय़ा छोटय़ा प्रश्नांवरून फक्त माझेच ऐका या प्रकाश आंबेडकरांच्या हुकूमशाही वृत्तीमुळे युती तुटली. तेव्हा वंचितबरोबरची आघाडी संपली.‘ महापालिकेच्या निवडणुकीत अन्य कोणत्याही पक्षाबरोबर निवडणूक लढविणे चुकीचे ठरेल. उलट प्रत्येकाने स्वतंत्र लढावे आणि निवडणुकीनंतर आघाडय़ा होतात का, याची चाचपणी एमआयएमकडूनही केली जाईल, असेही खासदार जलील यांनी सांगितले. राजकारणात काहीही घडू शकते, हे सर्वांनी पाहिलेच आहे. एकमेकांना साथ देणारी भाजप—शिवसेनेची युती तुटून नवीन समीकरणे होऊ शकतात, तर अशी समीकरणे करण्यास आम्हीही मागे राहू असे नाही, असेही खासदार जलील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!