🕒 1 min read
चेन्नई: तामिळनाडूमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर तेथील राजकारणात निवडणुकीसंबंधी हालचाल वाढू लागल्याचं दिसत आहे. दरम्यान यावेळी अभिनेता रजनीकांत निवडणूक लढवणार का ? अशी चर्चा रंगली आहे. मात्र याआधी रजनीकांत आपल्या सल्लागारांना पाठवलेल्या पत्रात स्वतःच्या प्रकृतीचे कारण दिले आहे. कोरोनाच्या काळात रजनी यांना कोणतीही जोखीम घ्यायची नाही. अमेरिकेत 2016 मध्ये त्यांचे मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले होते. जोपर्यंत कोविड -19 ची लस येत नाही, तोपर्यंत राजकारणात प्रवेश न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिल्याचे पत्रात म्हटले गेले आहे. मात्र सध्या रजनीकांत यांच्या राजकारणातील प्रवेश यावरून चर्चा सुरू आहे. यामागचं कारण म्हणजे तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रजनीकांत यांनी चेन्नई येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रजनीकांत लवकरच आपल्या राजकीय पक्षाची भूमिका ठरवत २०२१ मध्ये होणारी तामिळनाडू विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा करु शकतात.
तामिळनाडूमधील सर्व राजकीय पक्षांची नजर सध्या रजनीकांत काय घोषणा करतात याकडे लागली आहे. बैठकीनंतर रजनीकांत निवडणूक लढणार की नाही यासंबंधी अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. रजनीकांच यांनी आपण सर्वात आपला पक्ष रजनी मक्कल मंडरमच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असून त्यानंतरच निर्णय जाहीर करणार असल्याचं सांगितलं होतं. रजनीकांत गेल्या दोन वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहेत. मात्र अधिकृतपणे त्यांनी राजकारणात प्रवेश केलेला नाही. गतवर्षी अभिनेता रजनीकांत आणि कमल हासन यांनी एकत्रित काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर दोन्ही पक्ष युती करतील अशी शक्यता वर्तवली जात होती.
गेल्या महिन्यात रजनीकांत यांनी आपला राजकीय प्रवेश लांबणीवर पडण्याचे संकेत दिले होते. रजनीकांत यांच्या नावे असणारं एक पत्र तामिळनाडूत चर्चेचा विषय ठरलं होतं, यामध्ये डॉक्टरांनी करोना काळात प्रचार कऱण्यावरुन रजनीकांत यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली होती. डॉक्टरांनी रजनीकांत यांनी अजिबात प्रवास न करण्याचा सल्ला दिला होता. रजनीकांत यांनी हे पत्र आपलं नसल्याचं स्पष्ट केलं होतं. दुसरीकडे भाजपा आणि काँग्रेस तसंच स्थानिक पक्षांनी हा रणनीतीची भाग असल्याचा दावा केला होता. रजनीकांत यांनी डिेसेंबर २०१७ मध्ये तामिळनाडूत राजकीय पक्ष स्थापन करत असल्याची घोषणा केली होती. जयललिता आणि करुणानिधी यांच्या निधनानंतर ही घोषणा करण्यात आली होती. मात्र लोकसभा नि़वडणुकीत रजनीकांत यांनी सहभाग घेतला नव्हता. पण आता होणारी विधानसभा निवडणूक ते लढवणार असल्याची चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या
- ठाकरे सरकारबाबत असणारी नाराजी आगामी निवडणुकीतून दाखवून देईल : दानवे
- ‘…पण मुस्लीम उमेदवारला तिकीट देणार नाही’ भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
- शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला, लोकसेवा आयोगाच्या परिक्षा होणार कधी?ठाकरे सरकारवर दानवे बरसले
- ‘ही सरकारच्या कामांची वर्षपूर्ती नव्हे तर लोकोपयोगी कामांचे विद्यमान सरकारने घातलेले वर्षश्राद्ध’
- शिवसेनेतर्फे लहान मुलांसाठी अजान पठण स्पर्धेचं आयोजन; स्पर्धेवरून भाजप-शिवसेनेत वादंग

